राज ठाकरेंनी स्वत:हून बोलावून माझं कौतुक केलं : केतकी चितळे

सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचं निवास्थान असलेल्या कृष्णकुंज इथे ही भेट झाली.

राज ठाकरेंनी स्वत:हून बोलावून माझं कौतुक केलं : केतकी चितळे
Follow us
| Updated on: Jun 21, 2019 | 4:09 PM

मुंबई : सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचं निवास्थान असलेल्या कृष्णकुंज इथे ही भेट झाली. “राज ठाकरेंनी स्वतःहून बोलवले आणि माझ्या धाडसाचे अभिनंदन केले. महिलांच्या दबलेल्या आवाजाला वाव मिळाला. त्यासाठी राज ठाकरेंनी माझे अभिनंदन केले”, अशी माहिती केतकी चितळेने दिली.

दरम्यान, केतकी चितळेला ‘एपिलेप्सी’ हा आजार आहे. आज त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली त्यावेळी ‘एपिलेप्सी’बाबत जनजागृती करणारा बँड त्यांनी त्यांच्या मनगटावर बांधला.

अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांशी गप्पा करताना मराठी ऐवजी हिंदी भाषेचा उपयोग केला. त्यावेळी तिने फेसबूक लाईव्ह सुरु असताना मराठीचा अट्टाहास करत कमेंट करणाऱ्यांना तिने उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावरुनच केतकीला अश्लील भाषेत ट्रोलिंग करण्यात आले होते. या ट्रोलर्सना केतकी चितळेने तोडीस तोड उत्तर दिलं होतं.

काय आहे नेमकं प्रकरण?

अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्हवरुन गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी तिने  हिंदीत संवाद साधला होता. मात्र त्यापूर्वी तिने आपण हिंदी का बोलणार आहोत हे सांगितलं होतं. तसंच मी मराठी आहे म्हणून मराठीच बोलायला हवं असा सल्ला देऊ नका, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, असंही केतकीने म्हटलं होतं. मात्र तिच्या फेसबुक लाईव्हदरम्यान अनेकांनी अश्लिल कमेंट केल्या होत्या. अनेकांनी बलात्काराचीही धमकी दिली.

ट्रोलर्सच्या या कमेंटसना केतकीने पुन्हा फेसबुक लाईव्ह करुन उत्तर दिलं होतं.  ती म्हणाली, “मी एका व्हिडीओत मराठीविषयी बोलले नाही. जाहीर प्रेम दाखवले नाही, मी मराठी, मी मराठीचा बाणा लावला नाही, झेंडे फडफडवले नाही तर माझी मातृ आणि पितृ भाषा मोडकळीला लागेल, एवढी ती तकलादू नाही. मला माझ्या भाषेवर प्रेम दाखवावे लागत नाही. आता मला लाज वाटते महाराष्ट्र माझा म्हणायला. एकाच स्त्रीचा निषेध करायला तिच्यावर अश्लील भाषेत शेरेबाजी करावी लागते, शिवीगाळ करावी लागते, तिचा बलात्कार करावा लागतो, असा महाराष्ट्र माझा नाही”

आधीच्या व्हिडीओत काय म्हणाली होती?

केतकीने आपल्या आधीच्या व्हिडीओत म्हटले होते, “मी माझ्या मराठी बांधवांना सुरुवातीलाच सांगू इच्छिते की मला फक्त मराठी भाषिक लोक फॉलो करत नाही, तर इतर भाषिक लोकही फॉलो करतात. त्यामुळे आजचा व्हिडीओ हिंदी आणि इंग्लिशमध्ये असेल. त्यामुळे कृपया मराठीचे झेंडे फडफडवून नका. हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. कमीतकमी ती तुम्हाला येणं अपेक्षित आहे. म्हणून कृपया कमेंटमध्ये मराठी विसलीस का?

संबंधित बातम्या 

रेपची धमकी देणारा महाराष्ट्र माझा असू शकत नाही, ट्रोलर्सना केतकी चितळेची सडेतोड उत्तरं  

ट्रोलिंग प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.