Ramdas Athawale | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतकडून रामदास आठवलेंच्या तब्येतीची विचारपूस, वाढदिवशी सहभोजनाचे निमंत्रण!

कोरोनावर मात केल्यानंतर तब्येतीची विचारपुस करण्यासाठी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) यांनी केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री डॉ. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना फोन केला होता.

Ramdas Athawale | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतकडून रामदास आठवलेंच्या तब्येतीची विचारपूस, वाढदिवशी सहभोजनाचे निमंत्रण!
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 6:54 PM

मुंबई : कोरोनावर मात केल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) यांनी केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री डॉ. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना फोन केला होता. यावेळी राखी सावंत यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या स्नेहभोजनात सहभागी होण्यासाठी रामदास आठवले यांना आमंत्रण दिले. काही दिवसांपूर्वी राखी यांनी लग्न केल्याच्या बातम्या येत होत्या, याबाबतची माहिती स्वतः राखी सावंत यांनी आठवलेंना दिली. यावेळी आठवले यांनी राखी सावंत आणि त्यांच्या पतीलाही शुभेच्छा दिल्या (Actress Rakhi Sawant Calls Minister Ramdas Athawale).

रामदास आठवले यांना 27 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. अखेर त्यांची ही चाचणी कोरोना निगेटिव्ह आली. ‘मी पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झालो आहे’, असे म्हणत रामदास आठवले यांनी कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केले होते.

कोरोनामुक्त झाल्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष

रामदास आठवले यांना कोरोनाची कोणतेही लक्षणे दिसत नव्हती. त्यांची प्रकृती ही उत्तम होती. पण खबरदारीचा उपाय म्हणून 4 दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन आठवले यांनी केले होते.

रामदास आठवले यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे समजल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. रामदास आठवले उपचार घेत असलेल्या रुग्णालयापासून ते घरापर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना कोरोनामुक्तीसह दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या (Actress Rakhi Sawant Calls Minister Ramdas Athawale).

कलाकारांना आठवलेंचा खंबीर पाठिंबा

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) चर्चेत आली होती. अनुरागने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलने आपल्यला न्याय मिळावा, असे म्हणत अनेक खटाटोप केले होते. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्याने तिने थेट राज्यपालांकडे धाव घेतली होती. यात सगळ्यात तिला आरपीआयचे सर्वेसर्वा डॉ.रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता पायलने हाती आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात प्रवेश केला.

या आधीही रामदास आठवलेंनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील जाहीर पाठिंबा दर्शवला होता. आता राखी सावंतने देखील रामदास आठवलेंची आस्थेने विचारपूस केली आहे. इतकेच नव्हेतर, त्यांना सहभोजनाचे आमंत्रण देखील दिले आहे.

(Actress Rakhi Sawant Calls Minister Ramdas Athawale)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.