AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मशीन तुटेना, चोरट्यांनी 17 लाखांच्या रकमेसह ATM उचलून नेलं

संगमनेर शहरातील गुंजाळवाडी परिसरातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांनी एटीएममधील 17 लाख रुपयांसह मशीन पळवलं.

मशीन तुटेना, चोरट्यांनी 17 लाखांच्या रकमेसह ATM उचलून नेलं
| Updated on: Jun 22, 2019 | 3:18 PM
Share

अहमदनगर : चोरट्यांनी एटीएम लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता एटीएमच पळवण्याच्या घटना वाढत आहेत. संगमनेर शहरातील गुंजाळवाडी परिसरातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांनी एटीएममधील 17 लाख रुपयांसह मशीन पळवलं. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी वडगाव पान गावातील बँक ऑफ बडोदाचं एटीएमही फोडण्याचा प्रयत्न केला होता. तो अयशस्वी ठरल्यामुळे त्यांनी संगमनेरातील बँक ऑफ महाराष्ट्रचं एटीएम पळवून नेलं.

बँक लूट, दरोड्याच्या घटनेत महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सुरक्षा देण्याचं पत्र बँक कर्मचारी फेडरेशनने मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. पण तरीही या घटना वाढतच आहेत.

नगरमध्ये एकाच दिवशी दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर शहरातील नाशिक – पुणे महामार्गालगत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीनच चोरट्यांनी लांबवले. मध्यरात्रीच्या दरम्यान एटीएमजवळ कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत, अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मशिन फोडता न आल्याने त्यांनी थेट मशिन उचलूनच पोबारा केला आहे. या एटीएममध्ये जवळपास 17 लाखांची रक्कम होती.

दुसरीकडे वडगाव पान गावातील एक एटीएम फोडण्याच्या तयारीत असताना नागरिकांच्या हालचाली समजल्यानंतर चोरटे पसार झाले. चोरीची घटना घडल्याची माहिती मिळताच संगमनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ञ आणि डॉग स्कॉडच्या मदतीने चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एटीएमचे काही अवशेष नांदुर शिंगोटे भागात पोलिसांना आढळून आले आहेत. ही टोळी हरियाणातील असल्याचा पोलिसांना अंदाज आहे.

काही महिन्यांपूर्वी संगमनेर शहरातील दोन एटीएम फोडल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज आणखी दोन घटना घडल्या. ज्या पद्धतीने चोरट्यांनी संगमनेर शहरात उच्छाद मांडला आहे, तो बघता या चोरांना पकडणे पोलिसांसमोर एक आव्हानच आहे. कालच कोठडीतून पसार झालेल्या दोघांना अवघ्या तासाभरात पोलिसांनी जेरबंद केले होते. मात्र या चोरट्यांचा शोध लावण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.