पुण्यात कोरोना आटोक्यात न आल्यास परिणाम भोगावे लागतील, अजित पवारांकडून अधिकारी धारेवर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांवरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे (Ajit Pawar on increasing corona patient in Pune).

पुण्यात कोरोना आटोक्यात न आल्यास परिणाम भोगावे लागतील, अजित पवारांकडून अधिकारी धारेवर
Follow us
| Updated on: Jul 04, 2020 | 7:56 AM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे (Ajit Pawar on increasing corona patient in Pune). पुणे आणि पुणे जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात न आल्यास याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागतील अशा थेट शब्दात अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. पुण्यात नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असतानाही कारवाई होत नसल्याने अजित पवारांनी हा इशारा दिलाय. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना नियंत्रणाबाबत बैठक झाली. यावेळी अजित पवारांनी वाढत्या रुग्णप्रकरणी चिंता व्यक्त केली.

लॉकडाऊननंतर अनलॉकच्या टप्प्यात नागरिकांवरील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, असं करताना नागरिकांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. मात्र, तरीही पुण्यात अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये 50 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहत आहेत. या सर्व बाबींची अजित पवार यांनी नोंद घेतली. यावरुनच त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले.

अजित पवार म्हणाले, “लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यानं अधिकाऱ्यांची, प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये 50 ची मर्यादा असतानाही 50 पेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहत आहेत. मात्र, प्रशासनाकडून कारवाई होत नाही.” एकिकडे मुंबईत रुग्ण संख्या आटोक्यात येत आहेत. मग पुण्यात नेमकी काय अडचण आहे? असा सवालही अजित पवार यांनी विचारला.

विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत अजित पवार यांनी पुण्याच्या कोरोना नियंत्रणावरील कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. तसेच सध्या सुरु असलेल्या उपाययोजनांबाबतही नाराजी व्यक्त करत कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले. पुणे जिल्ह्यात टेस्टिंग इन्चार्ज म्हणून स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड 19 रुग्णांकडे दुर्लक्ष व्हायला नको, अशाही सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या. तसेच काही डॉक्टर कोरोना कक्षांमध्ये जात नाहीत अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित भागात निर्बंधाची कडक अंमलबजावणी आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर अजित पवार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले.

हेही वाचा :

MLA Corona | अहमदनगरमधील काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

नागपूर मध्यवर्ती कारागृहाला कोरोनाचा विळखा, कैदी, कर्मचारी, अधिकाऱ्यांसह 96 जण बाधित

Ajit Pawar on increasing corona patient in Pune

'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर
'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर.
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप.
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.