MLA Corona | अहमदनगरमधील काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण

अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली (Congress MLA Corona Positive) आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

MLA Corona | अहमदनगरमधील काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण

शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली (Congress MLA Corona Positive) आहे. त्यांच्यावर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज (3 जुलै) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका विद्यमान आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीदरम्यान त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यानंतर प्रशासनाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. मतदारसंघात काही जणांशी संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या त्यांच्यावर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंत्री, आमदारांना कोरोना

राज्यात यापूर्वी अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती.

तिकडे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्या एका आमदाराला कोरोना झाल्याचं निष्पण्ण झालं.

पुण्यातील भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण झाली. गीता जैन यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आलं (Congress MLA Corona Positive) आहे.

संबंधित बातम्या : 

MLA corona | मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजप आमदाराला कोरोनाची बाधा

Pimpari BJP MLA Corona | पिंपरीतील भाजप आमदाराला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *