भूलभुलैयाचा सिक्वल येणार, पण अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी ‘बॅड न्यूज’

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 2007 मध्ये रिलीज झालेला भूलभुलैया (Bhool Bhulaiyaa) चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी भूलभुलैया चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भूलभुलैयाचा सिक्वल येणार, पण अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी 'बॅड न्यूज'
Follow us
| Updated on: Aug 19, 2019 | 4:46 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 2007 मध्ये रिलीज झालेला ‘भूलभुलैया’ (Bhool Bhulaiyaa) चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी भूलभुलैया चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूलभुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

भूलभुलैया 2 चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच जारी करण्यात आला. पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतीमध्ये असलेला कार्तिक आर्यन हुबेहुब अक्षय कुमारप्रमाणे दिसत आहे. तसेच भूलभुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमारप्रमाणे दिसत आहे. कार्तिकने अक्षयप्रमाणे रुद्राक्षाच्या माळाही घातल्या आहेत. त्यासोबतच अक्षयप्रमाणे त्याने डोक्यावर पिवळा कपडाही गुंडाळला आहे.

भूलभुलैया 2 या चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये कार्तिक काऊचवर बसलेला दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये त्याच्या आजूबाजूला स्केलेटन्स दिसत असून त्यात तो झोपलेला दिसत आहे. तर त्याने स्वत: च्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर तो पाठमोऱ्या अवस्थेत उभा असलेला दिसत आहे.

View this post on Instagram

Ghostbuster is all set to enter ? Hare Ram Hare Ram ? Hare Krishna Hare Ram ? ? ? ❤️ #Bhoolbhulaiyaa2 ✌?

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

भूलभुलैया हा माझा आवडता चित्रपट आहे. माझ्या आवडत्या चित्रपटाचा मी आता एक भाग बनणार असल्याचा मला फार आनंद आहे. तसेच मी अक्षयचा खुप मोठा चाहता आहे. मी त्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करणाऱ्या असल्याने ही एक मोठी जबाबदारी आहे. असे कार्तिक आर्यनने या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले.

भूलभुलैया 2 हा चित्रपट अनीम बज्मी यांनी दिग्दर्शित केला आहे. भूषण कुमार मुराद खेतानी आणि कृष्णा कुमार हे तिघे या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. भूलभुलैया हा चित्रपट पुढच्या वर्षी 31 जुलैला रिलीज होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.