US Election 2020 Live: डोनाल्ड ट्रम्प की जो बायडन? आतापर्यंतचे आकडे काय सांगतात?

US Election 2020 Live:  डोनाल्ड ट्रम्प की जो बायडन? आतापर्यंतचे आकडे काय सांगतात?

आतापर्यंतच्या माहितीनुसार जो बायडन यांना 238 इलेक्ट्रोल व्होट्स तर डोनाल्ड ट्रम्प यांना 213 वोट्स मिळाले आहेत. राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडून येण्यसाठी अमेरिकेत 270 इलेक्ट्रोल व्होटसची गरज असते. America election result 2020 live Updates what number shows who will next President Biden or Trump

Yuvraj Jadhav

|

Nov 04, 2020 | 5:57 PM

वॉशिंग्टन: अमेरिका अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सुरुवातीला जो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडवी लढत देत कमबॅक केले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार जो बायडन यांना 238 इलेक्ट्रोल व्होट्स तर डोनाल्ड ट्रम्प यांना 213 वोट्स मिळाले आहेत. राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडून येण्यसाठी अमेरिकेत 270 इलेक्ट्रोल व्होटसची गरज असते. ट्रम्प यांनी कमबॅक केल्यामुळे या मतमोजणीच्या सुरुवातीला बायडन यांनी घेतलेली आघाडी कमी झाली. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याचा निकाल पेन्सिल्वेनिया, मिशिगन आणि विस्कोन्सीन या तीन रांज्याच्या निकालावर अवलंबून आहे. (America election result 2020 live Updates what number shows who will next President Biden or Trump)

जो बायडन यांच्या विजयाच्या शक्यता

जो बायडन यांनी फक्त अरिझोनामध्ये विजय मिळवल्यास त्यांची मतं 249 होतील, मात्र ती 270 चा आकडा गाठण्यास अपुरी ठरतील.  बायडन यांनी पेन्सिल्वेनियामध्ये विजय आणि अरिझोनामध्ये विजय मिळवला तर त्यांची मतं 269 होतील. अशावेळी दोन्ही उमेदवारांची मतं बरोबरीत असतील.

जो बायडन यांनी अरिझोनामध्ये विजय मिळवला आणि पेन्सिल्वेनियामध्ये पराभव झाला तर त्यांना मिशिगन आणि जॉर्जियामध्ये विजय मिळवावा लागेल. बायडन यांच्याकडील विजयी झालेली इलेक्ट्रोल व्होटस 238+ मिशिगन 16 + जॉर्जिया 16 अशा एकूण 270 मतासंह ते विजयी होऊ शकतात.

मात्र,मिशिगन, पैन्सिलवैनिया, जॉर्जिया आणि विस्कोन्सीनमध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवल्यास बायडन पराभूत होऊ शकतात. सध्या विस्कोन्सीनमध्ये बायडन आघाडीवर आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पिछाडीवर असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार कमबॅक केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 213 इलेक्ट्रोल व्होटस मिळाले आहेत. त्यांना विजयासाठी 57 इलेक्ट्रोल व्होटसची गरज आहे.

डोनाल्ड ट्रम्प मतमोजणी सुरु असणाऱ्या मिशिगन (16 ), पेन्सिल्वेनिया (20), नॉर्थ कॅरोलिना (15) आणि जॉर्जिया (16) या राज्यांमध्ये सद्यस्थितीत आघाडीवर आहेत. यासर्व राज्यांची मिळून 67 इलेक्ट्रोल व्होटस होतात. ही सर्व मत ट्रम्प यांना मिळाल्यास ते विजयी होऊ शकतात. या सर्व राज्यांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

अमेरिकेतील निकाल जाहीर न झालेल्या काही राज्यांतील स्थिती

डोनाल्ड ट्रम्प                    जो बायडन पैन्सिलवैनिया: 55.8 vs    43.1 मिशिगन : 52.2       vs   46.2 विस्कोन्सीन : 51.1    vs 47.4 जॉर्जिया : 50.5         vs 48.3 अरिझोना : 46.8       vs 80 उत्तर कॅरिलोना : 50.1 vs 48.7 अलास्का : 61.4           vs 34.7

संबंधित बातम्या:

US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात

US Election 2020 : अमेरिकेत निकालाच्या पार्श्वभूमीवर हिसेंची शक्यता, व्हाईट हाऊसचं रुपांतर तटबंदी किल्ल्यात

America election result 2020 live Updates what number shows who will next President Biden or Trump

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें