राज्यपालांचा फोन आलेला, अर्णव यांच्या नातेवाईकांना भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही : अनिल देशमुख

अर्णव गोस्वामी यांना जेलमध्ये फोन वापरण्याची मुभा आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं (Anil Deshmukh on Arnab Goswami case).

राज्यपालांचा फोन आलेला, अर्णव यांच्या नातेवाईकांना भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही : अनिल देशमुख

मुंबई :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोन आला होता. पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटू द्या, असं त्यांनी सांगितलं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व जेलमध्ये कोणत्याही कैद्याच्या नातेवाईकांना जेलमध्ये जाऊन भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे अर्णव यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही. पण ते फोनवर अर्णव यांच्याशी बोलू शकतात”, अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली (Anil Deshmukh on Arnab Goswami case).

“अर्णव गोस्वामी प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. जो निर्णय घ्यायचा आहे तो कोर्ट घेईल”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली (Anil Deshmukh on Arnab Goswami case).

“जेलमध्ये फोन वापरण्याची मुभा आहे. जेल प्रशासनाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्णव यांना त्यांचे नातेवाईक किंवा वकील प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत. पण फोनवर ते बोलू शकतील”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

“याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अर्णव यांना मारहाण झाली का? याबाबत बोलता येणार नाही. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप यात इंटरेस्ट घेते”, असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला.

अनिल देशमुख यांच्या हस्ते वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत यांचा आज (9 नोव्हेंबर) सत्कार करण्यात आला. सावंत यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करताना जीव धोक्यात घालून एका चलकाला पकडलं होतं. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. अनिल देशमुख यांच्या हस्ते दहा हजार रुपये आणि शाल-श्रीफळ देऊन सावंत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लोहिया प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लोहिया प्रकरणाबाबत मी माहिती घेतो, असं देशमुख यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ

अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI