पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर निर्णय

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे (Appointment of 4 IAS officer for corona prevention).

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर निर्णय
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 07, 2020 | 8:32 AM

पुणे : पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे (Appointment of 4 IAS officer for corona prevention). कोरोना रोखण्यासाठी आणि उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, कृषि आयुक्त सुहास दिवसे यांची याकामी नियुक्ती झाली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान यापूर्वी सहकार आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, साखर आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालक यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत टेस्टिंग इन्चार्ज म्हणून आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या चारही अधिकार्‍यांकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा, ग्रामीण आणि कॅन्टोनमेंट हद्दीतील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. माने यांच्याकडे कोरोना टेस्टिंग लॅब नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. सरकारी आणि खासगी मान्यताप्राप्त लॅबचा यामध्ये समावेश आहे. लॅबमध्ये टेस्टची संख्या वाढवणे, लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्यावर भर, टेस्टचा निर्णय कळण्याचा कालावधी कमी करणे अशा विविध जबाबदाऱ्यांचा यात समावेश आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधन आणि या संदर्भात आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी दिली. तर आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे रुग्णांच्या बेडची जबाबदारी सोपवण्यात आली. रुग्णांना वेळेवर बेड मिळणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णांना बेडसाठी इतरत्र फिरावे लागू नये. रुग्णालयातील बेडची डॅशबोर्डच्या माध्यमातून माहिती घेऊन योग्य नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी काम करत आहेत. मात्र त्यामध्ये लोकसहभाग असणं देखील आवश्यक आहे. त्यासाठी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे सामाजिक संस्थांची मदत घेवून सुनियोजित पध्दतीने लोकसहभाग वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 1245 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 29 हजार 844 झाली आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात 21 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 890 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही चांगलं आहे. काल दिवसभरात 1066 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 18 हजार 395 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

पुणे शहर

पुणे मनपा हद्दीत 861 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. पुणे मनपा हद्दीतील एकूण रुग्णांचा आकडा 22 हजार 381 वर पोहचला आहे. काल दिवसभरात 15 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत तब्बल 730 कोरोना रुग्ण दगावले आहेत. दिवसभरात 630 रुग्ण डिस्चार्ज करण्यात आले. यासह एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 13,739 वर पोहचली आहे. सध्या पुण्यात 7912 सक्रिय रुग्ण आहेत. यातील 368 गंभीर असून 64 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

हेही वाचा :

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 5368 नवे कोरोनाबाधित, तर गेल्या चार दिवसात 15 हजार रुग्णांना डिस्चार्ज

Pune Corona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, दिवसभरात नवीन 1245 रुग्ण

Lockdown | …तर पुण्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

Appointment of 4 IAS officer for corona prevention

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें