अर्जून तेंडुलकर मुंबईच्या संघात, पण निवडीवर का वाद?

महान भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसाठी या वर्षांच्या सुरुवातीलाच एक चांगली बातमी आली आहे.

अर्जून तेंडुलकर मुंबईच्या संघात, पण निवडीवर का वाद?

मुंबई : महान भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरसाठी (Arjun Tendulkar) या वर्षांच्या सुरुवातीलाच एक चांगली बातमी आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेसाठी अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे. जलदगती गोलंदाज कृतिक एच (Krutik H) आणि डावखुरा जलदगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची 22 सदस्यीय संघात निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंचा सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या 20 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. (Arjun Tendulkar Included In 22 Men Mumbai Squad For Syed Mushtaq Ali Trophy 2021)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच सर्व संघांना त्यांच्या संघांमध्ये 22 खेळाडू निवडण्याची सूट दिली होती. त्यामुळे मुंबईच्या संघाने दोन नव्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. त्यामुळे अर्जुनची मुंबईच्या संघात निवड झाली आहे. मुंबईच्या संघाची कमान दिग्गद खेळाडू आणि आयपीएल गावजवणारा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर अनुभवी यष्टीरक्षक आदित्य तरे मुंबईच्या संघाचा उपकर्णधार आहे.

सुरुवातीला कोरोना महामारीमुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी करंडक स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करावे लागले होते. आता ही स्पर्धा 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मुंबईच्या संघाचा या स्पर्धेत ‘ग्रूप इ’मध्ये समावेश करण्यात आला आहे. या ग्रूपमध्ये दिल्ली, हरयाणा, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी हे संघ असणार आहेत. येत्या 11, 13, 14, 17 आणि 19 जानेवारी रोजी मुंबईच्या संघाचे साखळी सामने होतील. त्यानंतर अहमदाबाद येथे बाद फेरी होणार आहे.

बीसीसीआयने तीन दिवसांपूर्वी सर्व संघांना 20 ऐवजी 22 खेळाडूंची संघात निवड करण्याची परवानगी दिली होती. कोरोनाच्या अनुषंगाने बीसीसीआयने हा बदल केला असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व खेळाडू कोरोनाबाबतच्या नियमांनुसार बायो-बबलमध्ये राहणार आहेत. तसेच, नेट्समध्ये गोलंदाजी करणारे आणि बदली खेळाडूसुद्धा बाहेरुन बोलावता येणार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर अर्जुन आणि कृतिक या दोघांची मुंबईच्या संघात निवड झाली आहे.

पहिल्यांदाज मुंबईच्या सिनियर टीममध्ये स्थान

अर्जुन तेंडुलकर आतापर्यंत मुंबईच्या ज्युनियर टीमकडून खेळत होता. 21 वर्षीय अर्जुनची पहिल्यांदाच मुंबईच्या सिनियर टीममध्ये निवड करण्यात आला आहे. अर्जुनचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय आहे. कारण नुकत्याच झालेल्या एका स्थानिक स्पर्धेत सूर्यकुमार यादवने अर्जुनच्या गोलंदाजीची खूप धुलाई केली होती.

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार तळपला

मुंबई क्रिकेट असोसिएशने दोन आठवड्यांपूर्वी आयोजित केलेल्या सराव सामन्यात धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) आपल्या बॅटिंगचा अप्रतिम नमुना सादर केला होता. केवळ 44 चेंडूत त्याने वेगवान शतक पूर्ण केलं होतं. यावेळी त्याने अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली होती. अर्जुनच्या एकाच षटकात सूर्यकुमारने 21 धावा फटकावल्या

अर्जुनची सराव सामन्यात निराशाजनक कामगिरी

अर्जून तेंडुलकरने 4 सराव सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. अर्जूनने या 4 सराव सामन्यात टीम D कडून खेळला. अर्जूनने यामध्ये केवळ 4 विकेट्स घेतल्या. तसेच अर्जूनला 3 वेळा फलंदाजीची संधी मिळाली. मात्र त्याला बॅटिंगनेही चमक दाखवता आली नाही. अर्जूनने केवळ 7 धावाच केल्या.

मुंबईच्या फलंदाजीची जबाबदारी अदित्य तारे, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, सिद्धेश लाड आणि शिवम दुबेच्या खांद्यांवर असणार आहे. तसेच बोलिंगची मदार धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडेकडे असेल. तर फिरकी गोलंदाजीसाठी संघात अर्थव अंकोलेकर आणि शम्स मुलानी यांना स्थान देण्यात आलं आहे.

असा आहे मुंबईचा संघ :

सुर्यकुमार यादव ( कर्णधार), आदित्य तरे ( उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तारडे, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे, आकाश पारकर, सुफीयां शेख, कृतिक एच. आणि अर्जुन तेंडुलकर

हेही वाचा

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार तळपला, 44 बॉलमध्येच धडाकेबाज शतक

(Arjun Tendulkar Included In 22 Men Mumbai Squad For Syed Mushtaq Ali Trophy 2021)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI