AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | बनावट व्हिसाच्या आधारे कॅनडाला निघालेल्या तरुणाला लोहगाव विमानतळावर अटक

 आरोपी तरुण औंध येथील रहिवासी आहे. तरुणाने कम्प्युटरच्या मदतीने दिल्ली ते व्हॅनकुवर (कॅनडा) असा व्हिसा बनवला. या प्रकरणी लोहगाव विमानतळ येथील शिफ्ट इंचार्ज अरविंदकुमार सिंग याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.

Pune Crime | बनावट व्हिसाच्या आधारे कॅनडाला निघालेल्या तरुणाला लोहगाव विमानतळावर अटक
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 3:12 PM
Share

पुणे – लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यानंतर अमेरिकेतून तरुण घरी परतला. कोरोनाकाळात अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही कुठेही नोकरी न मिळाल्याने तरुण नैराश्यात गेला होता. आई- वडिलांवर ओझे बनत आहोत का? अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच तरुणाने घराच्या घरी कॅनडाचा बनावट व्हिसा तयार केला. याच व्हिसाच्या आधारे विमानतळावर तरुणाला अटक करण्यात आली आहे.

असा झाला उलगडा

संबंधित तरुणाने आपल्याला कॅनडाला नोकरी लागल्याचे आई-वडिलांना सांगितले . त्यामुळे आपण कॅनडाला जात असल्याची माहिती आई-वडीलांना दिली. त्यानुसार त्याला सोडायला आई-बाबा विमानतळावर आले. मात्र आईवडील आल्याने तरुणाला विमातळात प्रवेश करावा लागला. त्यानंतर पुढील दोन-तीन तास तेथेच बसून राहिला. त्यानंतर मात्र तो पुन्हा ज्या लॉबीतून आत प्रवेश करतात तिथूनच बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सिक्युरिटीनी त्याला हटकले. व त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्याकडे बनावट व्हिसा व तिकीट असल्याचे आढळून आले. यावर कारवाई करत तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

आरोपी तरुण औंध येथील रहिवासी आहे. तरुणाने कम्प्युटरच्या मदतीने दिल्ली ते व्हॅनकुवर (कॅनडा) असा व्हिसा बनवला. या प्रकरणी लोहगाव विमानतळ येथील शिफ्ट इंचार्ज अरविंदकुमार सिंग याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.

ED| मी स्वतः ईडी कार्यालयात जायला तयार, सोमय्यांना प्रवक्ता बनवलं असेल तर जाहीर करा; मलिकांकडून सव्याज परतफेड

Nashik महापालिका निवडणूक | अवघ्या 10 दिवसांत जाहीर होणार प्रारूप प्रभागरचना कार्यक्रम

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 11 December 2021

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.