Wari 2020 | संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला

जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला जाणार हे निश्चित झालं (Ashadhi Ekadashi Wari 2020) आहे.

Wari 2020 | संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला

पुणे : राज्यातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला जाणार हे निश्चित झालं आहे. संत तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बरोबर 20 वारकरी असणार आहेत. येत्या 30 जूनला म्हणजेच दशमीला दोन्ही पादुका पंढरपूरकडे पाठवल्या जाणार आहेत. या दोन्ही पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. ती चाचणी झाल्यानंतर त्यांना या सोहळ्यात सहभाग घेता येणार आहे. (Ashadhi Ekadashi Wari 2020)

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. त्यामुळे शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या पायी वारी पालखी सोहळा यंदा रद्द झाला आहे. या दोन्ही पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर सरकारच्या निर्णयाप्रमाणे दोन्ही पालख्यांच्या पादुका पंढरपूरला पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार येत्या 30 जूनला तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरला पाठवल्या जाणार आहेत.

सकाळी सहा वाजता सजवलेल्या एस. टी. बसमधून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखी मार्गाने पंढरपूरला जातील. या दोन्ही पालख्या आपल्या पारंपारिक मार्गावरून परंपरेप्रमाणे दुपारी चारच्या सुमाराला पादुका वाखरीला पोहचणार आहेत. त्या ठिकाणी संतभेट होऊन पादुका पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.

यंदाची आषाढी पायी वारी सोहळा रद्द झाल्याचं दु:ख अनेकांना आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेणे गरजेचे होते. पण वारीची परंपरा जपण्यासाठी केलेले हे उपाय ही नक्कीच कौतुकास्पद आहेत. (Ashadhi Ekadashi Wari 2020)

संबंधित बातम्या : 

Palkhi Sohala 2020 | देहूनगरीत भक्तिरसाचा सोहळा, संत तुकोबांच्या पादुकांचे ऐतिहासिक नीरा स्नान संपन्न

Pandharpur Wari | माऊलींच्या पालखीची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्धार, नियमांचे काटेकोर पालन करणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI