शहीद जवानाच्या आईवर मोफत शस्त्रक्रिया, रुग्णालयातील भावनिक व्हिडीओ व्हायरल, अशोक चव्हाणांकडून डॉक्टरांना शाबासकी

औरंगाबादमधील रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये डॉक्टर आणि रुग्ण असलेली महिला भावूक झालेली पाहायला मिळाली. (Ashok Chavan appreciate Dr. Altaf Shaikh for waived fee of martyr mother )

शहीद जवानाच्या आईवर मोफत शस्त्रक्रिया, रुग्णालयातील भावनिक व्हिडीओ व्हायरल, अशोक चव्हाणांकडून डॉक्टरांना शाबासकी
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 7:42 PM

मुंबई : कोरोना संकटामध्ये संपूर्ण समाजाला डॉक्टरांचे महत्व समजले. भारतीयांनी कोरोना संकटात डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आपण पाहिली. औरंगाबादमधील डॉक्टर आणि एका महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये डॉक्टर आणि रुग्ण असलेली महिला भावूक झालेली पाहायला मिळाली. या व्हिडीओमधील ती महिला देशासाठी शहीद झालेल्या जवानाची आई असल्याचे समजल्यानंतर डॉ. अल्ताफ शेख यांनी त्यांच्याकडून फी घेतली नाही. डॉ. अल्ताफ शेख यांच्या या कृतीचे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कौतुक केले आहे. (Ashok Chavan appreciate Dr. Altaf Shaikh for waived fee of martyr mother )

डॉ.अल्ताफ शेख यांना रुग्णालयात दाखल झालेली महिला देशासाठी शहीद झालेल्या जवानाची आई असल्याचे समजले. यानंतर शेख यांनी शस्त्रक्रिया मोफत केली. सोशल मीडियावर डॉ. अल्ताफ शेख यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडीओची दखल घेतली.

अशोक चव्हाण यांनी डॉ.अल्ताफ यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. औरंगाबाद मधील डॉ.अल्ताफ यांनी उपचार करत असलेली महिला शहीदाची आई आहे, हे समजल्यानंतर त्यांची फी माफ केली. या अनोख्या गोष्टीची माहिती मिळताच मी डॉ. अल्ताफ यांना भेटण्साठी बोलवले आणि त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल आभार मानले आणि अभिनंदन केले, असं अशोक चव्हाण म्हणाले.

रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या त्या महिलेला शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज होती. त्यांच्या एका मुलाचा मृत्यू ह्रदयविकाराच्या धक्क्याने झाला आहे. तर, दुसरा मुलगा जम्मू काश्मीरममधील कुपवाडामध्ये सात वर्षांपूर्वी शहीद झाला आहे. हे समजल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाशी बोलून त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डॉ. अल्ताफ शेख यांनी दिली.

संबंधित बातम्या:

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाचा निर्णय लवकरच, सरन्यायाधीशांचे सूतोवाच,अशोक चव्हाणांची माहिती

मुख्यमंत्र्यांवर जेवढा अधिकार आमचा तेवढाच अशोक चव्हाणांचा, उद्धवजी, विकासाचा कोणताच प्रस्ताव नाकारणार नाही : विनायक राऊत

(Ashok Chavan appreciate Dr. Altaf Shaikh for waived fee of martyr mother )

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.