Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाचा निर्णय लवकरच, सरन्यायाधीशांचे सूतोवाच,अशोक चव्हाणांची माहिती

मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची भेट घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. (Ashok Chavan gave information that Chief Justice of India is Positive for Constitution Bench to hearing Maratha Reservation case)

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाचा निर्णय लवकरच, सरन्यायाधीशांचे सूतोवाच,अशोक चव्हाणांची माहिती
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 3:56 PM

मुंबई: मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी “घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधिशांनी हे सूतोवाच केले”, असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. (Ashok Chavan gave information that Chief Justice of India is Positive for Constitution Bench to hearing Maratha Reservation case)

राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे स्थगिती मिळाली आहे. या स्थगितीमुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती मुकूल रोहतगी यांनी आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांना केली असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा म्हणजे ७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण बाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या मागणीचा लेखी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. याच मागणीचा तिसरा लेखी अर्ज आज दाखल करण्यात आला.

मराठा आरक्षणावर 28 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देणारे न्यायमुर्ती एल.एन.राव यांच्यासमोर युक्तिवाद करण्यात आला. न्या. एल.एन. राव यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी 4 आठवडे तहकूब केली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर घटनापीठाकडे जायचे असल्यास जाऊ शकता आम्ही फक्त सुनावणी तहकूब करतो, असं म्हटलं होतं.

अशोक चव्हाण यांनी परभणी येथील एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्र सरकारच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही? मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे, अशी आशा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या : 

राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?; अशोक चव्हाणांचा थेट सवाल

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, पंढरपूर ते मुंबई पायी मोर्चा काढणार

(Ashok Chavan gave information that Chief Justice of India is Positive for Constitution Bench to hearing Maratha Reservation case)

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.