AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाण २ वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडण्याची, काँग्रेस सोडण्याची त्यांची योजना होती असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला.

अशोक चव्हाण २ वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
| Updated on: Feb 13, 2024 | 10:27 AM
Share

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडण्याची, काँग्रेस सोडण्याची त्यांची योजना होती असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

गेली अनेक दशके काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काल काँग्रेसमधून बाहेर पडले. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

२ वर्षांआधीच सोडणार होते पक्ष

अशोक चव्हाण हे आत्ताच नव्हे तर गेल्या काही काळापासूनच पक्ष सोडण्यासाठी धडपडत आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हाच चव्हाण यांचीही काँग्रेसमधून बाहेर पडण्याची धडपड सुरू होती. आता त्यांना बाहेर पडायला मुहुर्त मिळाला असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.

अशोक चव्हाण स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत

अशोक चव्हाण यांनी स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. आदर्श घोटाळा केलेले लोक तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. जनता तुमच्यावर थुंकत आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य केलं तसेच भाजपवरही टीका केली.

Follow Us
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री