अभ्यासक्रम कपातीच्या नावाखाली नेहरुंचे धडे गायब, आसाममधील प्रकार

आसामने 12 वीच्या अभ्यासक्रमात 30 टक्क्यांनी कपात केलीअसून पंडित नेहरुंचे धडे गायब आहेत. (Assam reduce syllabus by 30 per cent. Nehru's lessons removed) 

अभ्यासक्रम कपातीच्या नावाखाली नेहरुंचे धडे गायब, आसाममधील प्रकार
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त बालदिन का साजरा करतात?
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 6:24 PM

दिसपूर : सीबीएससी, महाराष्ट्र बोर्डानंतर आता आसाम सरकारनेही अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला आहे. आसाम सरकारने बारावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्क्यांनी कपात केली असून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे धडे वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आसाम सरकार आणि आसाम शिक्षण (AHSEC) मंडळावर टीका होत आहे. (Assam government reduce syllabus lessons Jawaharlal Nehru omitted)

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आसामच्या उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाने (AHSEC) बारावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्क्यांनी कपात केली. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयीचे धडे आणि मुद्दे वगळण्यात आले आहेत. (reduced syllabus Nehru’s lessons disappear) तसेच मंडल आयोगाचा अहवाल, जात आणि वर्गवाद या मुद्द्यांनाही अभ्यासक्रमातून वगळलं आहे.

अभ्यासक्रमातून वगळलेले मुद्दे

स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारण पहिल्या तीन निवडणुका राष्ट्र उभारणी आणि नेहरुंचा दृष्टीकोन नेहरुंचे विदेशी धोरण नेहरुनंतरचे राजकीय वारसदार गरिबी हटाओचे राजकारण गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन पंजाबवरील संकट आणि 1984 चे शीखविरोधी दंगे यूएफ आणि एनडीए सरकार अयोध्या विवाद 2004 ची निवडणूक आणि यूपीए सरकार

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच अभ्यासक्रमात कपात: शिक्षण मंडळ

शिक्षक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच अभ्यासक्रम कमी केल्याचं आसाम उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाने (AHSEC) म्हटलंय. तसेच याबाबत शंका आणि तक्रारी आल्यास पुन्हा बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असं म्हटलंय. दरम्यान, अभ्यासक्रम कपातीच्या नावाखाली नेहरुंशी संबंधित मुद्दे का वगळले? असे प्रश्न विचारले जात आहेत. आसाम शिक्षण मंडळाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आसाम उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव मनोरंजन काकती यांनी म्हटलंय “विद्यर्थ्यांचा कोरोना महामारीत विद्यार्थ्यांचा खूप वेळ गेला. सीबीएससी बोर्डानेही अकरावी, बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमात कपात केली. आम्ही सुद्धा यावर विचार करत होतो.” तसेच अभ्यासक्रम कपातीमागे विद्यार्थ्यांचा ताण दूर व्हावा हा एकमेव उद्देश असून यामागे कुठलेही राजकारण करण्याचा उद्देश नासल्याचं काकती यांनी म्हटलंय

संबंधित बातम्या:

Varsha Gaikwad | पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

उस्मानाबाद | आयुर्वेद अभ्यासक्रमात बदल करणार : मंत्री अमित देशमुख

(Assam government reduce syllabus lessons Jawaharlal Nehru omitted)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.