प्रसिद्ध उद्योजकाची पत्नीकडून चाकूने भोसकून हत्या

औरंगाबादमध्ये प्रसिद्ध उद्योगपती शैलेंद्र राजपूत यांची पत्नीनेच चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे.

प्रसिद्ध उद्योजकाची पत्नीकडून चाकूने भोसकून हत्या

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये प्रसिद्ध उद्योजकाची पत्नीनेच चाकूने भोसकून हत्या (Aurangabad Businessman Murder) केल्याची थरारक घटना समोर आली आहे. शैलेंद्र राजपूत यांची पत्नी पूजा राजपूत हिने हत्या केली असून घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

औरंगाबादमधील उल्कानगरी परिसरातील खिंवसरा पार्कमध्ये सोमवारी रात्री दीड वाजता हत्येचा थरार घडला. 40 वर्षीय शैलेंद्र शिवसिंग राजपूत यांच्या हत्येप्रकरणी (Aurangabad Businessman Murder) पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.

शैलेंद्र आणि त्यांच्या भावाचा वाळुंज एमआयडीसीमध्ये ‘हिरा पॉलिमर’ नावाचा व्यवसाय आहे.

पत्नीच्या साडीने गळफास, पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

शैलेंद्र आणि पूजा यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना 16 आणि सहा वर्षांच्या दोन मुली आहेत. मात्र पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असत. एकत्र कुटुंबात राहण्यावरुन दोघांमध्ये वाद व्हायचे. इतकंच नाही, तर पूजाने शैलेंद्र यांच्या आईविरोधात पोलिसात तक्रारही दिली होती.

वादाला कंटाळून शैलेंद्र पत्नी आणि मुलींसह मित्राच्या घरात भाड्यावर राहायला आले होते. चार महिन्यांपूर्वी पैठणरोडवरील बंगला सोडून ते खिवंसरा पार्कमधील घरात शिफ्ट झाले होते.

हत्येच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. त्यावेळी पत्नी शैलेंद्र यांच्यावर किचनमधील चाकूने वार केल्याचा आरोप आहे. अतिरक्तस्राव झाल्यामुळे शैलेंद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी पूजा राजपूत हिला अटक केली आहे.

Published On - 11:59 am, Tue, 17 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI