पत्नीच्या साडीने गळफास, पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

माढा पोलिस स्टेशनमधील पोलिस कॉन्स्टेंबल सुरेंद्र कटकधोंड यांनी राहत्या घरी पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे

पत्नीच्या साडीने गळफास, पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

सोलापूर : पत्नीच्या साडीने गळफास घेऊन सोलापुरात पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या (Solapur Police Constable Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 वर्षीय सुरेंद्र अजंता कटकधोंड यांनी राहत्या घरी आपलं आयुष्य संपवलं. ते माढा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते.

सुरेंद्र कटकधोंड हे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातून मे महिन्यात माढा पोलिस स्टेशनमध्ये रुजू झाले होते. सोलापुरातील पोलिस वसाहतीमध्ये कटकधोंड सहकुटुंब राहत होते. त्यांची पत्नी आणि दोन मुलं रविवारी रात्री 9.30 वाजता वसाहतीबाहेर प्रांगणात बसली होती, त्यावेळी घरात एकटं असल्याची संधी साधून त्यांनी हॉलमधील सिलिंग फॅनला पत्नीची साडी बांधून गळफास (Solapur Police Constable Suicide) घेतला.

वसाहतीतील महिलांना सुरेंद्र पंख्याला लटकलेले दिसल्यामुळे त्यांनी याची माहिती पत्नी आणि मुलांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. सुरेद्र कटकधोंड यांच्या पश्चात तीन वर्षांची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

आदित्य ठाकरेंना चार वेळा टोपी घालणारा भामटा, पाचव्यांदा अटक

सुरेंद्र यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र पोलिस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या कारणावरुन 12 सप्टेंबरला सुरेंद्र आणि एका पोलिस अधिकाऱ्याची कुरबुर झाली होती. त्यानंतर ते गैरहजरच राहिले होते. या वादामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *