AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती, 50 वर्षीय महिलेला बारचालकाने घरात घुसून जाळलं

महिलेला पेटवल्याप्रकरणी आरोपी संतोष मोहितेला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती, 50 वर्षीय महिलेला बारचालकाने घरात घुसून जाळलं
| Updated on: Feb 05, 2020 | 7:46 AM
Share

औरंगाबाद : वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये या घटनेची पुनरावृत्ती (Aurangabad Lady Set on Fire) घडली आहे. बिअर बार चालकाने घरात घुसून महिलेला जिवंत जाळल्याचा सुन्न करणारा प्रकार घडला. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात ही हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.

जळीतकांडामध्ये 50 वर्षीय महिला 95 टक्के भाजली आहे. तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महिलेला पेटवल्याप्रकरणी आरोपी संतोष मोहितेला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित महिला रविवारी घरी एकटीच असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपी तिच्या घरात घुसला. रात्रीच्या वेळेत घरी येण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावरुन आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं.

न्यायालयाने आरोपीला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, जनसमुदाय उत्स्फूर्तपणे रस्त्यावर

दरम्यान, हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून पेटवलेल्या पीडित प्राध्यापिकेची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु असून पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.

पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी काल (मंगळवारी) हिंगणघाट शहरातील मोठा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरला होता. हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, अशी मागणी सामान्यांकडून होत आहे.

लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही ‘हिंगणघाट बंद’मध्ये सहभागी झाले होते. ज्याप्रमाणे पीडितेला जाळण्यात आलं, तसंच आरोपीलाही जाळा, अशी मागणी काही संतप्त नागरिकांनी केली. नराधम आरोपीचा एन्काऊण्टर करा किंवा त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी प्रामुख्याने मोर्चात करण्यात आली.

Aurangabad Lady Set on Fire

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.