एका कोरोना रुग्णाची लपवाछपवी देशाला भोवली, ऑस्ट्रेलियामध्ये 6 आठवड्यांचा लॉकडाऊन

ऑस्ट्रेलियात (Australia) एका नागरिकाने कोरोना संसर्ग झालेला असतानाही आरोग्य विभागाला खोटी माहिती दिली. याचा फटका संपूर्ण ऑस्ट्रेलियाला बसला आहे.

एका कोरोना रुग्णाची लपवाछपवी देशाला भोवली, ऑस्ट्रेलियामध्ये 6 आठवड्यांचा लॉकडाऊन
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 10:18 PM

कॅनबेरा : कोरोना विषाणूचा (Coroanvirus) संसर्ग झाला असेल किंवा त्याची काही लक्षणं दिसत असतील तर अनेक लोक ही माहिती लपवतात. मात्र, कोरोनाशी संबंधित माहितीची लपवाछपवी केवळ त्या व्यक्तीसाठीच नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या समाजालाही महागात पडू शकते याचं एक मोठ उदाहरण समोर आलंय. ऑस्ट्रेलियात (Australia) एका नागरिकाने कोरोना संसर्ग झालेला असतानाही आरोग्य विभागाला खोटी माहिती दिली. याचा फटका संपूर्ण ऑस्ट्रेलियाला बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने संसर्गाचा धोका लक्षात घेत संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला आहे (Australia imposed lockdown after a Corona positive person hides his identity).

ही घटना दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये घडली. या ठिकाणी एका व्यक्तीच्या बेजबाबदार वर्तनामुळे प्रशासनाच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. संबंधित कोरोना बाधित व्यक्तीने त्याला संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभागाला खोटी माहिती दिली. हा व्यक्ती एका पिज्जा शॉपमध्ये काम करत होता. मात्र, संसर्ग झाल्यानंतर त्याने आपण काम करत असलेलं दुकान बंद होऊ नये म्हणून आपण केवळ पिज्जा आणण्यासाठी गेलो होतो सांगितलं.

यामुळे पिज्जा घ्यायला गेला असताना त्याला संसर्ग झाला असावा असं आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटलं. मात्र, त्या ठिकाणी जवळपास 36 जण कोरोना बाधित निघाल्यानंतर अखेर ऑस्ट्रेलिया प्रशासनाने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाचे स्टेस प्रीमिअर स्टीवर मार्शल यांनी या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सातत्याने कोरोना संसर्गाच्या घडामोडींवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया त्या निवडक देशांपैकी एक होता जिथं कोरोना संसर्ग खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित होता. मात्र, या घटनेनंतर येथील स्थिती बदलली आहे.

पोलिसांनी अद्याप खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दक्षिण ऑस्ट्रेलियाचे पोलीस आयुक्त ग्रांट स्टीवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरी माहिती समोर आल्यानंतर आता तपासाची प्रकिया बदलली आहे. जर या व्यक्तीने खरी माहिती दिली असती, तर देशात 6 आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याची गरज पडली नसती.

असं असलं तरी तेथील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी केवळ 3 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे निश्चित वेळेच्या आधीच लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

संबंधित बातम्या :

आता घर बसल्या स्वतःच कोरोना चाचणी करा, USFDA ची ‘सेल्फ टेस्ट किट’ला मंजुरी

मोठी बातमी : शेवटच्या चाचणीत फायझरची लस 95 टक्के परिणामकारक, लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता

वुहानचं सत्य जगासमोर आणल्यानं चीन चवताळला; महिला पत्रकाराला कठोर शिक्षा सुनावली

व्हिडीओ पाहा :

Australia imposed lockdown after a Corona positive person hides his identity

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.