सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार, शेतकऱ्यांनी विक्री करण्याची घाई करु नये- बाळासाहेब पाटील

सोयाबीनसाठी या वर्षी शासन राज्यात 3880 रुपये हमीभाव देणार आहे. येत्या 15 ऑक्टोबर पासून राज्यात खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. (balasaheb patil appeal to soyabeen farmers)

सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार, शेतकऱ्यांनी विक्री करण्याची घाई करु नये- बाळासाहेब पाटील

कराड: राज्य सरकार शेतकऱ्यांकडून सोयाबीन प्रति क्विंटल 3880 रुपये हमीभावाने करणार आहे. सोयाबीन खरेदी केंद्र 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करु नये, शासकीय खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.

राज्यात या वर्षी चांगला पाऊस झाला हा पाऊस आताही सुरु आहे. राज्यातील सोयाबीनचे पिक काढणे व मळणी काम अंतिम टप्यात आहे. काही शेतकरी आपला माल लवकरात लवकर विकावा यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडे जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर आपला माल विकावा, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

राज्यात अजूनही पाऊस पडत आहे त्यामुळे सोयाबीनला ओलसरपणा येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन विक्रीची घाई करु नये. सोयाबीनला राज्य शासनाने 3 हजार 880 रुपये भाव दिला आहे. राज्य शासनाकडून 15 ऑक्टोंबर पासून सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पेरणीनंतर अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. काही ठिकाणी सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली होती. सोयाबीन पीक काढणीच्या टप्प्यात असताना जोरदार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते.

संबंधित बातम्या :

Aurangabad Rain | औरंगाबादेत मुसळधार पाऊस, सोयाबीन-कपाशी पिकांचं नुकसान

Nagpur Breaking | सोयाबीन पिकावर ‘येलो मोझॅक व्हायरस’ चा प्रादुर्भाव

(balasaheb patil appeal to soyabeen farmers)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI