पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदी, प्रशासनाचे नवे आदेश

पुणे प्रशासनाने पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात आता नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदीचे आदेश दिले आहेत (Ban of Tenant and Workers in pune prohibited area).

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदी, प्रशासनाचे नवे आदेश
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 01, 2020 | 3:26 PM

पुणे : कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकडेवारीचा विचार करुन पुणे प्रशासनाने पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात आता नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदीचे आदेश दिले आहेत (Ban on Tenant and Workers in pune prohibited area). विशेष म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रातील जेष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुलं यांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच दूध, भाजीपाला विक्री सुरु असणार आहे. कोणत्याही सोसायटीत कोरोना रुग्ण आढळला, तर तेथे 28 दिवसांसाठी मायक्रो कंटेनमेंट झोन असणार आहे. प्रशासनाने नवीन आदेश जारी करत या मार्गदर्शक सूचना दिल्या.

पुणेकरांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासादायक स्थिती देखील आहे. पुण्यात आतापर्यंत 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण 10 हजार 451 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज करण्यात आले. एकूण रुग्णांच्या तुलनेत 61 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 17 हजार 228 झाला आहे. 350 रुग्ण अत्यस्थ असून विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मागील 10 दिवसांमध्ये पुणे शहरात साडेपाच हजार 482 रुग्ण आढळले आहेत. तर याच 10 दिवसांमध्ये 132 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या कालावधीत प्रशासनाने 28 हजार 656 नागरिकांच्या कोरोना चाचणी केल्या. तसेच 2 हजार 734 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

असं असलं तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. त्याच पार्श्वभूमीवर ससून कोविड रुग्णालयात पुढील 6 महिन्यांच्या कालावधीत 710 पदांची भरती होणार आहे. यामध्ये परिचारिका, विविध तांत्रिक पदांसह, चतुर्थश्रेणी पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहेत. आऊटसोर्सिंगने सर्व पदे भरली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

शरद पवारांनी काँग्रेसवर टीका केली नाही, ते राहुल गांधींना समजावून सांगतील : हसन मुश्रीफ

Corona new symptoms | कोरोनाची तीन नवी लक्षणे, पाठदुखीचाही समावेश : डॉ. जलील पारकर

Thane Lockdown | लॉकडाऊनआधी ठाणेकरांची भाजी खरेदीसाठी झुंबड, दामदुपटीविषयी नाराजी

Ban on Tenant and Workers in pune prohibited area

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें