पर्यटन बंदीतही नियम चुकवत थेट ‘वाशी टू लोणावळा’ रिक्षाने प्रवास, सात जण ताब्यात

पर्यटन बंदीतही नियम चुकवत थेट 'वाशी टू लोणावळा' रिक्षाने प्रवास, सात जण ताब्यात

पर्यटन स्थळावर जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असताना देखील पर्यटक हे लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येत आहेत.

Nupur Chilkulwar

|

Aug 04, 2020 | 8:24 PM

लोणावळा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यातील (Ban On Tourism At Lonavala) पर्यटन स्थळावर जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असताना देखील पर्यटक हे लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येत आहेत. लोणावळा शहर पोलिसांकडून येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई सुरुच आहे. या कारवाईतून वाचण्यासाठी पर्यटक अनेक शक्कल लढवताना पाहिला मिळत आहेत (Ban On Tourism At Lonavala).

आपण पर्यटनसाठी आलो हे कुणालाही समजू न देण्यासाठी काल (3 ऑगस्ट) नवी मुंबईतील वाशी येथून दोन रिक्षामध्ये सात पर्यटक लोणावळ्यात पोहोचले. लोणावळ्यातील गोल्ड व्हॅलीमधील माऊंट कॉटेज या बंगल्यात या लोकांनी नजरचुकवून प्रवेश मिळवला आणि पार्टी करण्यास सुरुवात केली. या मद्यप्रेमींकडून जोरदार पार्टी सुरु झाली. त्याचवेळी बाहेर लोणावळा पोलिसांची रात्रगस्त सुरु होती.

पोलिसांना या बंगल्याच्या बाहेर दोन रिक्षा आढळून आल्या. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता एम एच – 43 अर्थात मुंबईच्या वाशीतील रिक्षा असल्याचं निष्पन्न झालं. बंगल्याच्या आत पार्टी करणाऱ्यांना बाहेर पोलीस आल्याची माहिती देखील नव्हती. ते आपल्या पार्टीमध्ये दंग होते.

या पार्टीमध्ये पोलिसांनी एन्ट्री करताच पार्टी करणाऱ्यांचे धाबे दणाणले. या पर्यटकांकडून माहिती घेतली असता ते नवी मुंबईतील वाशी येथून पर्यटनासाठी आल्याचे निष्पन्न झाले. लोणावळा पोलिसांनी या 7 जणांना ताब्यात घेतले. तसेच, पर्यटन बंदी असताना देखील माउंट कॉटेज बंगला भाड्याने दिल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारपासून लोणावळा परिसरात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतील पर्यटक लोणावळा येथे सहलीचे आयोजन करत आहेत. लोणावळा सध्या पर्यटनास्थळ म्हणून बंद घोषित करण्यात आलं असून कुठल्याही पर्यटकाने लोणावळा परिसरात येऊ नये, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा लोणावळा पोलिसांकडून देण्यात आला आहे (Ban On Tourism At Lonavala).

संबंधित बातम्या :

WaterFall Photos : राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस, औरंगाबादमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल

पर्यटकांना खुणावणारा साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा फेसाळला, लॉकडाऊनमुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें