वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा ( Barack Obama) यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकानं आणखी एक विक्रम केला आहे. अनेक गौप्यस्फोट करणारे ओबामांचे पुस्तक बाजारात येताच पहिल्या 24 तासात 8 लाख 90 हजार प्रतींची विक्री झाली आहे. आधुनिक काळात अध्यक्षपदाच्या अनुभववावर आधारित पुस्तकाला इतक्या मोठ्या प्रमाण पहिल्यांदा प्रतिसाद मिळाला आहे. (Barack Obama memoir A Promised Land record setting on first day sale)