पाकचं विमान दिसताच पाडा, युद्धासाठी तयार राहा, भारतीय वायूसेनेला आदेश

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेतला संघर्ष […]

पाकचं विमान दिसताच पाडा, युद्धासाठी तयार राहा, भारतीय वायूसेनेला आदेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेतला संघर्ष वाढलाय. एकीकडे राजधानी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरु आहे, तर दुसरीकडे हायअलर्ट जारी करण्यात आलाय. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या विमानतळांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामध्ये अमृतसर, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट या विमानतळांचा समावेश आहे. शिवाय भारतीय वायूसेनेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या विमानांनी जम्मू काश्मीरमधील नौसेरामध्ये घुसखोरी करत बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. ही विमाने भारतीय वायूसेनेने वेळीच पिटाळून लावली. शिवाय पाकिस्तानचं प्रमुख F-16 हे विमान भारताने पाडलंय. पाकिस्तानचं विमान दिसताच पाडा, असा आदेश भारतीय वायूसेनेला देण्यात आलाय. त्यामुळे दोन्ही देशांच्या वायूसेनेचा संघर्ष टोकाला पोहोचलाय.

पाकिस्तानचं विमान पाडलं

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या भारतीय वायूसेनेने वेळीच उत्तर दिलं आणि हा प्रयत्न हाणून पाडला. विशेष म्हणजे भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं सर्वात महत्त्वाचं असलेलं F-16 हे विमान पाडल्याची माहिती आहे. हे विमान पडत असताना पायलट पॅराशूटच्या माध्यमातून उडी फेकत असल्याचंही दिसून आलंय.

व्हिडीओ पाहा :

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.