वाशिममध्ये पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका, शेतकरी चिंताग्रस्त

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वाशिममध्ये पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका, शेतकरी चिंताग्रस्त
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 4:33 PM

वाशिम : तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. (Because of heavy rain in Washim Soybean crop has been badly affected)

राज्यातला शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांनी वेढलेला असतो. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरुळनाथ या तालुक्यांत मोठा पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर पिकाचं नुकसान झालं. त्यातही सोंगणीला आलेल्या सोयाबीनला जास्त फटका बसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

काही ठिकाणी सोयाबीन काढणी, तर काही ठिकणी कापणीचं काम सुरु आहे. त्यामुळे शेतात पीक असूनही शेतकऱ्यांना काहीही करता आले नाही. परिणामी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच झालेल्या नुकसानीचा लवकर पंचनामा करुन पीकविम्याचा लाभही मिळावा, अशी देखील मागणी शेतकरी करत आहेत.

कापलेल्या सोयाबीनला आग, एक लाखाचे नुकसान

वाशिम जिल्ह्यातील पांडव उमरा गावातील एका शेतकऱ्याच्या कापलेल्या सोयाबीनला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. शेतकऱ्याने आपल्या चार एकर शेतातील सोयाबीन कापून ठेवले होते. आग लागल्याने सर्व सोयाबीन जळून खाक झाले आहे. पीडित शेतकऱ्याने शेतातील सोयाबीन अज्ञाताने जाळल्याचा आरोप केला आहे. तसेच एक लाखाचे नुकसान झाल्याचा दावाही शेतकऱ्याने केला आहे. वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विदर्भात शेतकऱ्यांची लूट, हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी

दरम्यान, राज्यात काही ठिकाणी शेतीमाल हमीभापेक्षा कमी किमतीत खरेदी केला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागपूमध्ये सोयाबीन पिकासाठी शासनाने ठरवून दिलेला हमीभाव हा 3880 आहे. पण भिवापूरच्या बाजारात सोयाबीनला फक्त 2800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून शेतऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. तसा आरोप भिवापूरच्या शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे मराठवाडा, विदर्भ या भागातला शेतकरी अतिवृष्टीमुळे हैरान आहे. त्यातच शेतकऱ्यांची अशा प्रकारे होणारी लूट समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न बिकट होत चालले असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

  देशात वर्षभरात 10 हजार 281 शेतकरी आत्महत्या, दुर्देवाने महाराष्ट्राचा क्रमांक पहिला

खासगी कंपन्यांनाही शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा लागणार, काँग्रेसचा केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ‘मॉडल अ‍ॅक्ट’

Prakash Javadekar | ऊसाला आता प्रतिटन 2850 रुपये हमीभाव : प्रकाश जावडेकर

(Because of heavy rain in Washim Soybean crop has been badly affected)

Non Stop LIVE Update
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.