AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात वर्षभरात 10 हजार 281 शेतकरी आत्महत्या, दुर्देवाने महाराष्ट्राचा क्रमांक पहिला

कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

देशात वर्षभरात 10 हजार 281 शेतकरी आत्महत्या, दुर्देवाने महाराष्ट्राचा क्रमांक पहिला
| Updated on: Oct 11, 2020 | 1:05 PM
Share

नवी दिल्ली : मागील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) अद्याप थांबलेल्या नाहीत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीबीआर) 2019 मधील देशातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार देशातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात दुर्वैवानं महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. (10,281 farmer suicides in india in one year, Unfortunately Maharashtra Ranks first)

सोसायट्यांचे कर्ज, कौटुंबिक आणि सामाजिक अडचणी, नापिकी, ओला आणि सुका दुष्काळ, बोगस बियाणे, शासकीय मदत न मिळणे यांसारख्या अनेक कारणांनी हैराण झालेला शेतकरी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलतो. एनसीबीआरच्या आकडेवारीनुसार देशात 2019 मध्ये तब्बल 10 हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी तीन हजार 927 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.

राज्य सरकारच्या कर्जमाफीनंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. बाजारपेठेत पिकाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी संकटात सापडतात. बाजारपेठेत माल विकायला गेल्यानंतर त्यांच्या हातात पिकासाठी केलेल्या गुंतवणुकीपेक्षाही कमी रक्कम पडते. यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टचक्रात सापडतात, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, 2018 मध्येदेखील शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र सर्वात पुढे होता. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2018 या एकाच वर्षात तब्बल 10 हजार 349 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी होऊनही, महाराष्ट्रात तब्बल 3 हजार 594 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. महत्त्वाचं म्हणजे बिहारसारख्या राज्यात या वर्षात एकाही शेतकरी किंवा शेतमजुराने आत्महत्या केल्याची नोंद नाही.

संबंधित बातम्या

”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे”, मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास

(10,281 farmer suicides in india in one year, Unfortunately Maharashtra Ranks first)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.