माझ्या नवऱ्याला न्याय द्या, भावाला फाशी द्या, भाग्यश्रीचा टाहो

माझ्या नवऱ्याला न्याय द्या, भावाला फाशी द्या, भाग्यश्रीचा टाहो

बीड : त्या दोघांनी प्रेम केलं, लग्न केलं आणि सुखाने संसार करत होते, पण मध्ये आली ती प्रतिष्ठा आणि मुलीच्या भावाने हा संसार उद्ध्वस्त केला. बीडमधल्या ऑनर किलिंगच्या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. यी पीडितेने आपल्या नवऱ्याला न्याय मिळावा यासाठी आर्त टाहो फोडलाय. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत, पण अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने ही पीडित तरुणी आणखी खचली आहे.

नवऱ्याला न्याय देण्यासाठी आरोपी भावाला फाशी देण्याची मागणी पीडित भाग्यश्रीने केली आहे. पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोपही तिने केलाय. आरोपींना पकडा या मागणीसाठी सुमितच्या नातेवाईकांना मृतदेह घेऊन आंदोलन करावं लागलं. अखेर आता पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत. वाचा संपूर्ण घटानाक्रम : प्रेमविवाह केल्याचा राग, भावाने बहिणीसमोर तिच्या नवऱ्याला संपवलं!

“मी खूप विनवण्या केल्या, पण त्याने ऐकलं नाही, सपासप वार केले, माझी एवढीच विनंती, माझ्या नवऱ्याला न्याय द्या, आरोपींना फाशी द्या”, अशी मागणी करताना भाग्यश्रीने टाहो फोडला.

भाग्यश्री आणि तिचा पती सुमित हे दोघे बीडच्या आदित्य इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. परीक्षा देऊन परत येत असताना सुमितवर हा हल्ला करण्यात आला. सुमितवर हल्ला झाला तेव्हा त्याचे अनेक मित्र बाजूला होते, पण कुणीही मध्यस्थी केली नाही. “माझ्या घरचे आधीच तयारी करुन बसले होते, माझ्या नवऱ्यावर वार केले, माझ्या मदतीला कोणीच आलं नाही, माझ्या नवऱ्याला मी एकटीनेच नेलं, कुणीच मदत केली नाही”, असंही भाग्यश्री म्हणाली.

भाग्यश्री आणि सुमित वाघमारे… लांडगे कुटुंबातली भाग्यश्री आणि सुमित यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांनी कुटुंबीयांचा विरोध डावलून लग्न केलं. सुमितच्या घरच्यांनी हे नातं स्वीकारलंही. पण भाग्यश्रीच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. वाघमारे कुटुंबीयांना दोघांचं नातं स्वीकारण्यासाठी दोन वेळा विनंती केली, पण त्यांना अपमानित करुन माघारी पाठवण्यात आलं. वाचा प्रेमविवाहाला विरोध, मुलीच्या भावाकडून तरुणाची भररस्त्यात ‘सैराट’ स्टाईल हत्या

कोण आहे मृत सुमित?

सुमित इंजिनिअरिंगला होता

आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज बीड येथे शिक्षण घेत होता.

मुलगीही त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

मुलगा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा कार्यकर्ता होता.

दीड महिन्यापूर्वी कोर्टात लग्न केलं होतं.

लग्नानंतर सुमितच्या घरच्यांनाही त्रास देण्यात आला. सुमितला हॉटेलमध्ये घेरुन त्रास दिला होता.

हत्येच्या दिवशी सुमित कॉलेजमध्ये परीक्षेसाठी गेला होता.

सुमित आणि त्याची पत्नी सोबत असताना हल्ला झाला.

सुमित आणि त्याची पत्नी रुम घेऊन सोबत राहत होते.

सुमित माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील रहिवाशी आहे.

मुलगी बीड येथील रहिवाशी होती.

मुलगी श्रीमंत असून सुमितची आर्थिक परिस्थिती डबघाईची होती.

VIDEO : भाग्यश्री टीव्ही 9 मराठीवर लाईव्ह

 

Published On - 6:34 pm, Thu, 20 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI