AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमदार मेटे साहेब उधारी द्या’, जाहिरातीचे पैसे वसूल करण्यासाठी वृत्तपत्रानं बातमीच छापली!

शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्याकडे असलेले जाहिरातीचे पैसे वसूल करण्यासाठी बीडमधील एका वृत्तपत्राने थेट बातमीच छापली आहे. त्यात मेटे यांच्याकडील उधारीचा आकडाही देण्यात आला आहे.

'आमदार मेटे साहेब उधारी द्या', जाहिरातीचे पैसे वसूल करण्यासाठी वृत्तपत्रानं बातमीच छापली!
विनायक मेटे, नेते, शिवसंग्राम
| Edited By: | Updated on: Dec 06, 2020 | 6:26 PM
Share

बीड: शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांच्याकडील जाहिरातीची उधारी वसूल करण्यासाठी बीड जिल्ह्यातील लोकाशा या वृत्तपत्रानं थेट जाहिरातच छापली आहे. लोकाशाने छापलेल्या बातमीनुसार दिवाळी अंक 2017, 2018 आणि 2019च्या वर्धापनदिनाला आमदार मेटे आणि त्यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी जाहिरात दिली होती. त्याचे पैसे अद्याप दिले नसल्याचं या बातमीमधून सांगण्यात आलं आहे. जाहिरातीचे पैसे मागण्यासाठी थेट बातमी छापण्याचा हा प्रकार राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. (lokasha news on Vinayak Mete about advertising money)

संबंधित वृत्तपत्राने छापलेल्या बातमीमध्ये एका फोर्ड गाडीचा फोटो देण्यात आला आहे. ही गाडी विनायक मेटे यांची असल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘सर्वप्रथम आपण फोर्ड कंपनीची गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन. आपण शून्यातून विश्व निर्माण केले याबाबत जनतेला नेहमीच कौतुक राहिले आहे. गावातून मुंबई जिंकण्याची किमया आपण गेली 25 वर्षे साधत आहात. त्याचेही विश्लेषण करता येईल. मात्र, आजचे प्रयोजन आपल्याकडील उधारी मागण्याचे आहे. महाराष्ट्राचा डोलारा सांभाळताना आपल्याला आठवण राहिली नसेल किंवा आम्हीच आपणास आठवण करुन देण्यास कमी पडलो असू. म्हणून आपल्याला आज जाहीर आठवण करुन देत आहोत’, असं या बातमीमध्ये छापण्यात आलं आहे. या बातमीप्रमाणे विनायक मेटे यांच्याकडे 77 हजार रुपये, तर त्यांचे भाऊ रामहरी मेटे यांच्याकडे 20 हजार रुपये उधारी बाकी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पत्रकाराच्या पगारातून पैसे कपात!

जाहिरात हेच वर्तमानपत्रातील कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं. पण अनेकदा अनेक पुढारी, अनेक लोक जाहिरातीचे पैस बुडवतात. त्याचा फटका वृत्तपत्रांच्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागतो. दैनिक लोकाशाचे वृत्त संपादक भागवत तावरे यांच्यामार्फत मेटे यांची जाहिरात आली होती. त्यामुळे त्यांच्या वेतनातून या जाहिरातीचे पैसे कापण्यात आले. त्यानंतर तावरे यांनी मेटे यांच्या उधारीची चांगलीच चर्चा घडवून आणली. त्यानंतर आमदार विनायक मेटे यांनी असे अनेकांचे पैसे दिले नसल्याची चर्चा सुरु आहे. आता तावरे यांची फेसबूक पोस्ट आणि लोकशाने पहिल्याच पानावर छापलेली जाहिरात राज्यात चांगलीच चर्चिली जात आहे.

दरम्यान या बातमीबाबत आम्ही आमदार विनायक मेटे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

संबंधित बातम्या:

राज्य सरकारची नियत चांगली नाही, त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, विनायक मेटेंचा घणाघात

“नितीन राऊतांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू”, महावितरणच्या भरती प्रक्रियेवरुन विनायक मेटेंचा इशारा

lokasha news on Vinayak Mete about advertising money

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.