मुस्लिमांबाबत कधीही भेदभाव नाही, संघ मुख्यालयावर ध्वजारोहणानंतर भय्याजी जोशींची प्रतिक्रिया

देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. देशात आज 71 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे.

मुस्लिमांबाबत कधीही भेदभाव नाही, संघ मुख्यालयावर ध्वजारोहणानंतर भय्याजी जोशींची प्रतिक्रिया

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महाल येथील संघ मुख्यालयात आज सकाळी आठ वाजता सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर भय्याजी जोशी यांनी शिघ्र कृती दलाचे जवान आणि सीआयएसएफच्या जवानांशी संवाद साधला. यावेळी “या देशात मुस्लिमांसोबत कधीही भेदभाव झाला नाही”, अशी प्रतिक्रिया भय्याजी जोशी यांनी दिली.

“नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध हा न समजता केला गेलेला विरोध आहे. या कायद्याला विरोध करणं चुकीचं आहे. सर्वात अगोदर सरकारने हा कायदा का आणला? हे समजून घेतलं पाहिजे. मात्र कळत नाही देशातील वातावरण का खराब केलं जात आहे. हा कायदा समजून घ्या, असं मी आवाहन करतो. या कायद्यात सर्व धर्मातील लोकांना सामावून घेतलं आहे. सर्व देशवासियांनी संविधानाचा मान राखला पाहिजे”, असं भय्याजी जोशी ध्वजारोहणानंतर म्हणाले.

देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. देशात आज 71 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीच्या राजपथावर भारतीय सैन्याची परेड सुरु आहे. राजपथावरील पराक्रम संपूर्ण जगाला बघायला मिळत आहे. राजपथावर सुरु असलेल्या परेमध्ये देशातील विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी झाले आहेत. या चित्ररथांमध्ये देशातील विविध संस्कृतीचं दर्शन होत दर्शन होत आहे. याशिवाय महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते ध्वारारोहण करण्यात आलं.

Published On - 9:40 am, Sun, 26 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI