Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरातून थेट तुरुंगात

| Updated on: Jun 22, 2019 | 6:17 PM

बिग बॉसच्या सेटवरुन अटक करण्यात आलेल्या अभिजीत बिचुकलेंना चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र खंडणी प्रकरणात मात्र त्याला जामीन नामंजूर केला आहे.

Bigg Boss Marathi 2 :  अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरातून थेट तुरुंगात
Follow us on

Bigg Boss Marathi 2 सातारा : बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) चेक बाऊन्स प्रकरणी काल (21 जून) सातारा पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायलयाने मोठा निर्णय दिला आहे. बिग बॉसच्या सेटवरुन अटक करण्यात आलेल्या अभिजीत बिचुकलेंना चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र खंडणी प्रकरणात मात्र त्याला जामीन नामंजूर केला आहे. कोर्टाने बिचुकलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून बिचुकले थेट कोठडीत रवाना झाला. आता येत्या सोमवारी बिचुकले न्यायालयात दाद मागणार आहे.

कोर्टात काय घडलं ?

बिचुकलेंना एका चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी बिग बॉस मराठीच्या सेटवरुन अटक केली होती. याप्रकरणी आज (22 जून) सातारा जिल्हा न्यायलयात हजर केले गेले. त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र अभिजित बिचुकलेला खंडणी प्रकरणी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे बिचुकलेंची रवानगी बिग बॉसच्या घरातून थेट न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे.

दरम्यान “या सर्व राजकीय खेळ्या असून यात मला अडकवलं जातंय,” अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकलेंनी  कोर्टात दाखल होण्यापूर्वी प्रसार माध्यमांना दिली आहे.

माझ्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या वकील संदीप सकपाळ यांचा मी 12 वर्षापासून भाडेकरु आहे. त्यांनी माझ्याकडून भाड्याचे पैसे घेतले. पण ते हे अमान्य करत आहेत. चार वर्षापूर्वी म्हणजे 2015 मधील जुनी केस त्यांनी उकरुन काढली आहे. कोर्टाची दिशाभूल करुन त्यांनी माझ्याविरोधात अटक करण्याची नोटीस बजावली. अशी प्रतिक्रिया बिचुकलेंनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

“या प्रकरणात नक्कीच राजकीय हस्तपेक्ष आहे. राजकीय स्वार्थसाठी वकील संदीप सकपाळचा उपयोग केला जात आहे. साताऱ्यात बिग बॉसच्या कार्यक्रमात जाण्यापूर्वी  किंवा आता माझी चांगली प्रतिष्ठा आहे. मी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करणार आहे. त्यामुळे संदीप सकपाळला अमिष दाखवून माझ्याविरोधात भडकवलं जात आहे. माझा कोर्टावर पूर्णपणे विश्वास असून या प्रकरणाचा लवकरच निकाल लागेल अशी मला खात्री आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.”

बिचुकलेंना चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी बिग बॉस मराठीच्या सेटवरुन अटक केली आहे. या प्रकरणी तक्रार करणाऱ्या वकील संदीप सकपाळ यांच्याशी टीव्ही 9 मराठीने बातचीत केली होती.

बिचुकले माझ्या ओळखीचे असल्याने मी त्याला अडअडचणीला लागेल ती मदत करायचो. त्याला फेब्रुवारी 2015 मध्ये खासगी कामासाठी 50 हजार रुपयांची गरज होती. त्यानुसार मी त्याला 50 हजार रुपयांची रोख  दिली. मी पैशासाठी त्याच्या मागे तगादा लावल्यानंतर 2015 मध्ये अखेर त्याने मला 28 हजार रुपयाचे एक चेक दिला. तो मी बँकेत क्लिअरन्ससाठी टाकल्यानंतर मात्र तो बाऊन्स झाला. चेक बाऊन्स झाल्याने मी त्याच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अशी प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्ती केली.

संबंधित बातम्या 

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक का आणि कशी झाली? वकिलांनी अख्खी स्टोरी सांगितली

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची मुंबईत येऊन कारवाई

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त  

Bigg Boss Marathi-2 : शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरली

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा