Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’ मेकर्सचा मोठा निर्णय, ‘Me Too’ आरोपानंतर अनु मलिक पुन्हा पडद्यावर अवतरणार?

दिवाळी निमित्ताने स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास संगीत कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’ मेकर्सचा मोठा निर्णय, ‘Me Too’ आरोपानंतर अनु मलिक पुन्हा पडद्यावर अवतरणार?

मुंबई : प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस 14’ला (Bigg Boss 14) आणखी मनोरंजक कसे बनवता येईल, यासाठी मेकर्स शक्य तितके प्रयत्न करत आहेत. सोमवारच्या भागात ‘बिग बॉस की अदालत’ टास्क आयोजित करण्यात आला होता. या टास्कमध्ये दिग्दर्शिका फराह खान पाहुणी म्हणून घरात गेली होती. या टास्क दरम्यान तिने स्पर्धकांना बऱ्याच गोष्टी सुनावल्या. तसेच, खेळासंबंधित सूचना देखील दिल्या. आता लवकरच काही संगीतकार घरात प्रवेश करणार असल्याचे कळते आहे. यात अनु मलिकचे (Anu Malik) नाव समोर येत आहे (Bigg Boss 14 Latest Update Anu Malik will be seen in coming episode).

माध्यम सूत्रांच्या माहितीनुसार, संगीतकार अनु मलिक, शान आणि सचिन-जीगर हे दिवाळीच्या निमित्ताने घरात येणार आहेत. दिवाळी निमित्ताने स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास संगीत कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासाठीच मेकर्सनी या संगीतकारांना बोलवणे धाडले आहे.

‘Me Too’ प्रकरणात अनु मलिकचे नाव

या आधी अनु मलिक ‘इंडियन आयडॉल’मध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी अनु मलिकवर ‘मी टू’चे आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे त्यांना ‘इंडियन आयडॉल’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, त्यांच्यावरील कुठलेही आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा एकदा अनु मलिक ‘बिग बॉस’च्या मंचावरून छोट्यापडद्यावर पुनरागमन करणार आहे.(Bigg Boss 14 Latest Update Anu Malik will be seen in coming episode)

‘बिग बॉस’च्या घरात हंगामा

सध्या घरात नवा हंगामा पाहायला मिळत आहे. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. तर, या आठवड्यात वाईल्ड कार्ड एंट्री झालेल्या नैना सिंहला पुन्हा घरी परतावे लागले आहे. घरातून बाहेर गेलेल्या कविता कौशिकला ‘पब्लिक डिमांड’वर पुन्हा एकदा घरात पाचारण करण्यात आले आहे.

(Bigg Boss 14 Latest Update Anu Malik will be seen in coming episode)

सलमानची ‘शाळा’

एजाजवर चिडलेल्या पवित्राला सलमानने चांगलेच बोल सुनावले. कविताचे एजाजशी असलेले वागणे आवडले नाही तर, तू एजाजशी तसेच का वागलीस?, असा प्रश्न सलमानने तिला विचारले. सलमान खानने पवित्राला चुकीचे ठरवत, तिला चांगलेच खडे बोल सुनावले. चिडलेल्या पवित्राने एजाजला धक्का मारला होता.याशिवाय तिने त्याला बरेच काही सुनावले देखील होते. तर, हे सगळे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप सलमानने पवित्रावर केला.

यावेळी पुन्हा एकदा त्याच्या भांडणाचा व्हिडीओ लावण्यात आला होता. पवित्राने आपल्याला एजाजची मागायची आहे असे म्हटले. तर, घरातील इतर स्पर्धकांनी पवित्राला न रोखल्यामुळे त्यांनाही यावेळी सलमानच्या रागाला सामोरे जावे लागले.

(Bigg Boss 14 Latest Update Anu Malik will be seen in coming episode)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI