AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनला पाहून सलमानला कतरिना आठवली!

सलमानने यावेळी घरातल्या स्पर्धकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्याने पाठीमागून बोलणाऱ्या स्पर्धकांना चांगलेच बोल लगावले.

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनला पाहून सलमानला कतरिना आठवली!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 25, 2020 | 11:07 AM
Share

मुंबई : ‘बिग बॉस’च्या घरात नुकताच ‘विकेंड का वार’ पार पडला. या भागात स्पर्धकांच्या आठवडाभराच्या खेळावर सलमानच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. भागाच्या सुरुवातीला सलमान खानने (Salman Khan) सगळ्या स्पर्धकांना नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. सलमानने यावेळी घरातल्या स्पर्धकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्याने पाठीमागून बोलणाऱ्या स्पर्धकांना चांगलेच बोल लगावले. तर, यावेळी त्याने जास्मीन भसीनचे (Jasmin Bhasin) तोंड भरून कौतुक केले. (Bigg Boss 14 Latest update Salman Khan praised Jasmin bhasin)

गरबा क्वीन प्रीती-पिंकीची घरात एंट्री

नवरात्रीच्या निमित्ताने घरात खास पाहुण्यांचे आगमन झाले होते. गरबा क्वीन प्रीती आणि पिंकी या दोन बहिणींनी घरात एंट्री घेत, सगळ्या स्पर्धकांना गरब्याच्या तालावर फेर धरायला लावले. या निमित्ताने काळ घरात नवरात्रीची धूम पाहायला मिळाली. या दोघी घरात पाहुण्या म्हणून आल्या होत्या. कोरोनाची दाहकता लक्षात घेता या दोघींनी वेगवेगळ्या काचेच्या केबिनमधून गाणी गायली.

दिव्या खोसलाची सरप्राईझ व्हिझिट

प्रीती आणि पिंकीसोबतच घरात ‘टी सीरीज’च्या दिव्या खोसला-कुमारची देखील एंट्री झाली होती. घरात आलेल्या दिव्याने स्पर्धकांना एक खास टास्क दिला होता. दोन दोन स्पर्धकांच्या जोड्यांना एकमेकांसमोर बसून, त्यांच्या डोळ्यात आपल्याला काय दिसते ही सांगायचे होते. या टास्क दरम्यान जान कुमार सानूने पुन्हा एकदा निक्की तंबोलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलट भडकलेल्या निक्कीने जानला चांगलेच बोल सुनावले. या टास्क दरम्यान सगळेच स्पर्धक एकमेकांवर राग काढताना दिसले.( Bigg Boss 14 Latest update Salman Khan praised Jasmin bhasin)

चंद्रमुखीची झलक

सलमानने व्हिडीओ कॉलवर एका खास पाहुण्याची स्पर्धकांशी भेट घडवली. ही खास पाहुनी होती अभिनेत्री कविता कौशिक. यावेळी कविताने घरातल्या स्पर्धकांशी गप्पा मारल्या. त्याचबरोबर ती एजाज खानची मस्करी करताना दिसली. या घरात कविताची ‘वाईल्ड कार्ड’ एंट्री होणार असल्याची कुणकुणदेखील घरातल्या इतर स्पर्धकांना नाहीय.

टीव्हीची कतरिना कैफ

या भागात सलमानने (Salman Khan) सगळ्याच स्पर्धकांना बोल लावले दिसले. मात्र, यावेळी त्याने जास्मीन भसीन (Jasmin Bhasin)चे विशेष कौतुक केले. तू मला खूप आवडतेस, कारण तू टीव्हीची कतरिना कैफ आहेस, असे सलमानले जास्मीनला म्हटले आहे. सलमानच्या या कौतुकाने सध्या जास्मीनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भागाच्या शेवटी जाता-जाता सलमानने आजपेक्षा उद्या जास्त मजा येणार असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे. आजच्या म्हणजेच रविवारच्या भागात नव्या चेहऱ्यांची एंट्री होण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.

(Bigg Boss 14 Latest update Salman Khan praised Jasmin bhasin)

संबंधित बातम्या : 

Salman Khan | टीआरपीसाठी ओरडल्याने काहीच साध्य होत नाही, सलमान खानचा खोचक टोला! 

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘चंद्रमुखी’ राज, ‘या’ नव्या स्पर्धकाची एंट्री?

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...