चोरांनी लिपस्टिकने आरशावर लिहिलं ‘वहिनी खूप चांगली आहे’

घरातून 60 लाखांसह दागिने लंपास केल्यानंतर 'वहिनी खूप चांगली आहे' असा संदेश चोरांनी लिपस्टिकने आरशावर लिहून ठेवला.

चोरांनी लिपस्टिकने आरशावर लिहिलं 'वहिनी खूप चांगली आहे'

पाटणा : बिहारमध्ये चोरांचा अनोखा कारनामा पाहायला मिळाला. घरातून 60 लाखांसह दागिने लंपास केल्यानंतर ‘वहिनी खूप चांगली आहे’ असा संदेश चोरांनी लिपस्टिकने आरशावर (Thieves Writes with Lipstick on Mirror) लिहून ठेवला.

छटपूजेसाठी घर बंद ठेवून गावी गेलेल्या बिहारमधील व्यापाऱ्याच्या घरात चोरी झाली. पाटण्यातील पत्रकार नगर परिसरात हनुमाननगर भागात व्यापारी राहत होता. छटपूजेनिमित्त तो सपत्नीक वृद्ध माता-पित्याच्या घरी म्हणजेच गावी गेला. त्यावेळी हा प्रकार घडला.

चोरांनी घरातून 60 लाख रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि महागड्या वस्तू चोरांनी लंपास केल्या. घरातील कपडे अस्ताव्यस्त फेकले. चोरांनी व्यापाऱ्याचं घर अक्षरशः धुवून नेलं आहे. ब्रश, टूथपेस्टपासून कणीकही चोरांनी सोडली नाही.

मेव्हणीने प्रेमात फसवलं, पित्याची तीन मुलांना विष पाजून आत्महत्या

जाताना चोरांनी ड्रेसिंग टेबलवर असलेल्या आरश्यावर लिपस्टिकने एक मजकूर लिहिला. ‘वहिनी तू खूप चांगली आहेस, तुझे मनापासून आभार, देव करो तुमची खूप भरभराट होऊ दे.’ असं चोरांनी लिहून ठेवलं.

आमचे काही नातेवाईक इमारतीतील दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहात असल्याची माहिती तक्रारदार व्यापाऱ्याने दिली. भावाला त्यांच्याजवळ ठेवलं असल्याचंही त्याने सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरी कोणी नसताना ही चोरी (Thieves Writes with Lipstick on Mirror) झालेली असल्यामुळे या घटनेला घरफोडी नाही तर चोरी म्हणावं लागेल. पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून सध्या तपास सुरु आहे.

Published On - 1:00 pm, Tue, 5 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI