अपघातात पाय गेले, मेकॅनिकने लावला दुचाकी चोरण्याचा सपाटा, 6 महिन्यात 13 वाहने चोरली

अपघातात पायाला मोठी जखम झाल्याने पाय अधू झाले. गॅरेजमध्ये काम जमत नसल्याने नोकरी गेली. यामुळे शिखरे पुन्हा एकदा गुन्ह्याकडे कळला. मोरे चौक, प्रताप चौक, एमआयडीसी वाळूज व घाटी परिसरातून मेकॅनिक असल्याने त्याला सहज लॉक तोडून गाड्या चोरून नेता येत होत्या.

अपघातात पाय गेले, मेकॅनिकने लावला दुचाकी चोरण्याचा सपाटा, 6 महिन्यात 13 वाहने चोरली
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादः वर्षभरापूर्वी एका अपघातात पाय गमावल्याने अपंगत्व आलेल्या मेकॅनिकने आपले कौशल्य दुचाकी चोरण्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. दोन्ही पाय गमावल्यामुळे लंगडत लंगडत त्याने सहा महिन्यांत तब्बल 13 दुचाकी चोरून त्या गावात शेजाऱ्यांसह नातेवाईकांनाच स्वस्तात विकल्या. गुन्हे शाखेने (Crime branch) तपास करून देविदास तोताराम शिखरे (Totaram Shikhre) याला गंगापूर (Gangapur)  तालुक्यातील गाजगाव येथून अटक (Crime) केली.

गुन्हेगार ते मेकॅनिक.. पुन्हा गुन्हे!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करीतल होता. त्याच्यावर 2006,2008 मध्ये क्रांती चौक पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत. परंतु पोलिसांकडून वारंवार पकडले गेल्यानंतर त्याने गॅरेजमध्ये काम सुरु केले. काही महिन्यांपूर्वी त्याचा अपघात झाला. त्यात पायाला मोठी जखम झाल्याने त्याचे पाय अधू झाले. त्यामुळे गॅरेजमध्ये काम जमत नसल्याने त्याची नोकरी गेली. यामुळे शिखरे पुन्हा एकदा गुन्ह्याकडे कळला. मोरे चौक, प्रताप चौक, एमआयडीसी वाळूज व घाटी परिसरातून मेकॅनिक असल्याने त्याला सहज लॉक तोडून गाड्या चोरून नेता येत होत्या.

13 दुचाकी जप्त

गुन्हे शाखेचे निरीक्षक आघाव, उपनिरीक्षक गजानन सोनटक्के या प्रकरणी तपास करीत असताना वाळूजमधील दुचाकी गाजगावमधील शिखरे याने चोरल्याचे उघडकीस आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त केल्या. शिखरे याच्या घरी पोलीस पोहोचताच काहींनी रात्रीतून त्याच्या घरासमोर गाड्या आणून उभ्या केल्या.

इतर बातम्या-

अर्जुन खोतकरांवरची कारवाई शिवसैनिकांच्या जिव्हारी, जालन्यात ED च्या मदतीने शिवसेनेचा ‘गेम’ केल्याची भावना

VIDEO: ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण, मलिक म्हणतात, ‘बाते कम, काम ज्यादा’ हेच आमचं धोरण


Published On - 10:56 am, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI