पुण्यात तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल

सध्या शहर असो किंवा गाव प्रत्येक ठिकाणी चौकात मोठ्या थाटात वाढदिवस (Cake cutting with sword pune) साजरे करण्याची फॅशन जोरदारपणे सुरु आहे.

पुण्यात तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल

पुणे : सध्या शहर असो किंवा गाव प्रत्येक ठिकाणी चौकात मोठ्या थाटात वाढदिवस (Cake cutting with sword pune) साजरे करण्याची फॅशन जोरदारपणे सुरु आहे. गावामधील गल्ली गल्लीत दादा, भाई, भाऊ यांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे होतात. पुण्यातही जुन्नर तालुक्यात असाच एका मलुाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी केक हा तलवारीने कापण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल (Cake cutting with sword pune) केला आहे.

रोहन बेल्हेकर असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहनने वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कपला. याचे फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

रोहनचा वाढदिवस 2 मार्च रोजी धुमधडाक्यात डीजेच्या दणदणाटात साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा होत असताना रोहन बेल्हेकर याने तलवारीने केक कापला. केक कापलेले फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाढदिवस करताना तलवार या घातक हत्याराने केक कापला आणि गावांमध्ये घातक हत्यार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती नारायण गाव पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी बर्थडे बॉय रोहन बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला आहे.

चौकात वाढदिवस साजरा करून केक कापण्याचे लोण आता शहरी परिसरातून ग्रामीण भागाकडे हळू हळू वळू लागले आहे. गावामधील गल्ली गल्लीत दादा, भाई यांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे होत आहेत. या लोकांच्या वाढदिवसानिमित्ताने मोठी गर्दी होत असते. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे या वाढिदवस साजरा करण्यावर लगाम बसेल अशी शक्यत वर्तवली जात आहे.

Published On - 12:42 pm, Thu, 5 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI