AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला मतदारसंघच उरला नाही, पंकजा मुंडे यांची वेदना, असं का म्हणाल्या ?

भारतीय जनता पक्षाकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या अभियानात सहभागी झाल्या आहेत. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. मात्र त्यांच्या एका विधानाची आता जोरदार चर्चा सुरू आहे.

मला मतदारसंघच उरला नाही, पंकजा मुंडे यांची वेदना, असं का म्हणाल्या ?
भाजप नेत्या पंकजा मुंडे
| Updated on: Feb 12, 2024 | 9:20 AM
Share

महेंद्र मुधोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 12 फेब्रुवारी 2024 : भारतीय जनता पक्षाकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या अभियानात सहभागी झाल्या असून त्यांनी बीड शहराजवळ असलेल्या नारायण गडावर जाऊन नगद नारायणाचे दर्शन घेतलं आणि तिथून पोंडूळ या गावी लोकांशी संवाद साधून मुक्काम केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. मात्र त्यांच्या एका विधानामुळे मोठी चर्चा रंगली आहे. ‘ मला मतदारसंघ राहिलेला नाही ‘ अस विधान करत पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली.

मला मतदारसंघच उरला नाही

पोंडूळ येथे ग्रामस्थांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी मन की बात लोकांच्या समोर ठेवली. मागच्या पाच वर्षांमध्ये कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची कायम चर्चा होते आणि ती होणं स्वाभाविक आहे कारण लोकांना आणि मीडियाला असं वाटतं की मला एखादी उमेदवारी मिळावी. तशीच आता सुद्धा चर्चा होते असं मत पंकजा यांनी व्यक्त केलं.

यावेळी त्यांनी एक मोठं विधानही केलं. ‘आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला तसा मतदारसंघ राहिलेला नाही’ असे सांगत पंकजा मुंडे यांनी मला लोकसभेला जायला आवडेल का राज्यसभेला जायला आवडेल हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झालाय, असं म्हटलं.  मला कुठे जायला आवडेल यापेक्षा लोकांना मला कुठे बघायचंय हे महत्त्वाचं आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

भाजपच्या अभियानात सहभागी

भाजपच्या गाव चलो अभियान सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पंकजा मुंडे या अभियानाच्या निमित्ताने बीडच्या पौंडूळ गावात मुक्कामासाठी आहेत. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत मोठं वक्तव्य केलं. “तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला आज इथे कुंकू लावलं, मला कडक लक्ष्मीचे रूप दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितलं. मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला. त्यांना चहा विकावा लागला. शाळेत त्यांना फी भरायला पैसे नव्हते, शाळेत जाताना त्यांना अनंत अडचणी आल्या”, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...