भाजप आमदाराची पत्रकाराला मारहाण करत गोळी मारण्याची धमकी

उत्तर प्रदेशमधील पत्रकारावर पोलिसांनीच हल्ला केल्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. यात भाजपचे उत्तराखंडमधील आमदार कुंवर प्रवीण चॅम्पियन यांनी पत्रकार राजीव तिवारी यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

भाजप आमदाराची पत्रकाराला मारहाण करत गोळी मारण्याची धमकी


नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील पत्रकाराला पोलिसांनीच मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक घटना समोर आली आहे. भाजपचे उत्तराखंडमधील आमदार कुंवर प्रवीण चॅम्पियन यांनी पत्रकार राजीव तिवारी यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

भाजप आमदार कुंवर प्रवीण चॅम्पियन त्यांच्याविरोधातील बातम्यांमुळे नाराज होते. त्यानंतर त्यांनी संबंधित पत्रकार तिवारी यांना दिल्लीतील उत्तराखंड भवनात बोलावले. या ठिकाणी तिवारी यांना मारहाण करत गोळी मारून ठार करण्याची धमकीही देण्यात आली. पत्रकार राजीव तिवारी यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.

राजीव तिवारी नेहमीप्रमाणे आपल्या रिपोर्टिंगच्या कामावर होते. त्यावेळी आमदार कुंवर प्रवीण यांनी तिवारी यांना फोन करुन भेटण्यासाठी बोलावले. राजीव त्यांचे काम संपवून त्यांना भेटायला दिल्लीतील उत्तराखंड भवनात गेले. राजीव तेथे पोहचल्यानंतर कुंवर प्रवीण यांनी आपले पिस्तुल मागवले आणि तिवारी यांच्यासमोर टेबलवर ठेवले. त्यानंतर कुंवर पत्रकार तिवारींना थेट धमकी देत म्हणाले, “माझ्याविरोधात बातमी चालवल्यास गोळी मारुन हत्या करेल.” यावेळी तेथे 6-7 लोक उपस्थित होते.

कोणत्या बातमीमुळे आमदाराने पत्रकाराला धमकी दिली?

तिवारी यांनी दिलेल्या बातमीप्रमाणे दिल्ली उत्तराखंड भवनात हरिद्वारच्या नंबर प्लेटचे एक वाहन लावलेले होते. आमदार चॅम्पियन या गाडीचा उपयोग करत होते. ही एक खासगी गाडी होती, तरिही त्यावर बेकायदेशीरपणे उत्तराखंड पोलीस असे लिहिलेले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI