AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक काम करा, विषाची बाटली आणा, तुम्ही अर्धी प्या, मी अर्धी पितो : भाजप आमदार

नाशिक : भाजपचे नाशिक जिल्ह्यातील चांदवडचे आमदार राहुल आहेर यांनी कर्जबाजारी शेतकऱ्याला अजब सल्ला दिलाय. माझ्यावरही कर्ज आहे. विषाची बाटली आणा. तुम्ही अर्धी प्या, मी अर्धी पितो, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडला. या प्रकारामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ऊसाचे चुकारे मिळत नसल्याने बाळासाहेब डेर्ले या शेतकऱ्याने काही […]

एक काम करा, विषाची बाटली आणा, तुम्ही अर्धी प्या, मी अर्धी पितो : भाजप आमदार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

नाशिक : भाजपचे नाशिक जिल्ह्यातील चांदवडचे आमदार राहुल आहेर यांनी कर्जबाजारी शेतकऱ्याला अजब सल्ला दिलाय. माझ्यावरही कर्ज आहे. विषाची बाटली आणा. तुम्ही अर्धी प्या, मी अर्धी पितो, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडला. या प्रकारामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

ऊसाचे चुकारे मिळत नसल्याने बाळासाहेब डेर्ले या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी कारखान्याच्या बॉयलरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पैसे देण्याचं आश्वासन देऊन डेर्ले यांची समजूत काढण्यात आली. यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांच्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी, आमदार राहुल आहेर आणि वसाका कारखान्याच्या ठेकेदारांची बैठक झाली.

जिल्हाधिकारी कार्यालायत झालेल्या या बैठकीतच खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. पैसे मिळत नसतील तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं बाळासाहेब डेर्ले यांनी म्हणताच, आमदार राहुल आहेर यांनी त्यांना किती कर्ज आहे, अशी विचारणा केली. त्यावर डेर्ले यांनी तीन लाख रुपये असं उत्तर दिलं. यानंतर आमदार साहेब म्हणाले, “माझ्यावर सात कोटी रुपयांचं कर्ज आहे, विषाची बाटली आणा, तुम्ही पण अर्धी बाटली प्या आणि मी अर्धी पितो”

आमदारांच्या या वक्तव्यानंतर वातावरण तापलं होतं. पण अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि शेतकऱ्यांना शांत केलं. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लवकरच कारखान्यांच्या ठेकेदारांची संयुक्त बैठक घेऊ, असं आश्वासन आमदार राहुल आहेर यांनी दिलं.

खरं तर लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे जातात. पण लोकप्रतिनिधींकडूनही असं बेजबाबदार उत्तर मिळत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न आहे.

Follow Us
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार