बिहारच्या जनतेने गुंडाराजला नाकारत, विकासराजला स्वीकारलं : जे पी नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमधील भाजपसह एनडीएच्या विजयाच्या सभेत बोलताना हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या धोरणाचा असल्याचं म्हटलं.

बिहारच्या जनतेने गुंडाराजला नाकारत, विकासराजला स्वीकारलं : जे पी नड्डा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Nov 11, 2020 | 7:50 PM

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमधील भाजपसह एनडीएच्या विजयाच्या सभेत बोलताना हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या धोरणाचा असल्याचं म्हटलं. तसेच बिहारने तेथील गुंडाराज नाकारत विकासाच्या शासनाला स्वीकारल्याचंही म्हटलं (BJP National President JP Nadda addresses party workers at BJP headquarters in New Delhi).

जे. पी. नड्डा म्हणाले, “बिहारच्या यशासाठी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो. त्यांनी देशाला आणि समाजाला पुढे नेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. देशात फक्त बिहारची निवडणूक नव्हती, तर लडाखपासून कर्नाटकपर्यंतचे पोटनिवडणुकाही होत्या. त्यातही भाजपला मोठं यश मिळालं.”

“कोरोना संकट काळानंतरची ही पहिली निवडणूक होती. कोरोना संकटात जनता निवडणुकीला कसा पाठिंबा देईल, अशी आम्हाला चिंता होती. पण देशातील सर्व जनतेने कमळच्या चिन्हाचं बटन दाबून मोदींवर विश्वास दाखवलं. बिहारच्या जनतेने गुंडाराज नाकारुन विकासराजला स्वीकारलं आहे,” असंही जे. पी. नड्डा यांनी सांगितलं.

‘मोदींच्या नेतृत्वात भारताने कोरोनाचा यशस्वी सामना केला’

जे. पी. नड्डा म्हणाले, “अनेक मोठमोठे देश कोरोनासमोर हरले, पण भारताने कोरोनाचा यशस्वी सामना केला. संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. देशात एकच कोरोना चाचणी करणारी पुण्याची प्रयोगशाळा होती, आता 1650 प्रयोगशाळा झाल्या. पीपीई किट किंवा व्हेंटिलेटर देखील भारतातच तयार होत असून जगभरात निर्यात केली जातेय.”

“कोरोना संकट काळात मोदींनी फक्त देशाची चिंता नाही केली तर संपूर्ण जगाची काळजी घेतली. मोदींनी देशातील कंपन्यांना प्रेरित करुन देशात व्हेंटिलेटरचं उत्पादन तयार केलं. याचा उपयोग भारतासह इतर देशातील नागरिकांनाही झाला. कोरोना संकट काळात मोदींनी फक्त देशाची चिंता नाही केली तर संपूर्ण जगाची काळजी घेतली,” असंही ते म्हणाले.

जे. पी. नड्डा यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  • मोदींनी प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना आणली. संयुक्त राष्ट्र संघ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील मोदींचं कौतुक केलं. मोदींनी आरोग्यासह आर्थिक विश्वाच्या अडचणींचंही निराकरण केलं आहे.
  • कोरोना संकटाने मोठमोठ्या महासत्तांच्या आरोग्य व्यवस्थेची अवस्था बिकट झाली. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने जे काम केलं, योग्य वेळी लॉकडाऊन घोषित करुन देशाच्या 130 कोटी जनतेचा जीव वाचवला आहे.
  • आमच्या लक्षात आहे की, ज्यादिवशी लॉकडाऊन जाहीर झाला त्यादिवशी टेस्टिंगसाठी फक्त एक लॅब होती. लॉकडाऊन काळात पंतप्रधान मोदींनी देशाला तयार केलं. आता मी अभिमानाने सांगू शकतो की, आज देशात 1650 टेस्टिंग लॅब आहेत.

संबंधित बातम्या :

Prime Minister Narendra Modi LIVE : भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शाह दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले

LIVE | बिहारच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन, भाजप कार्यालयात जल्लोष

संबंधित व्हिडीओ :

BJP National President JP Nadda addresses party workers at BJP headquarters in New Delhi

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें