AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Boat Overturn | सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू

सांगलीतील पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात पुरात अडकलेल्या 30 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून बोट पाठवण्यात आली होती. मात्र ती उलटल्यामुळे पाण्यात बुडून काही नागरिकांना प्राण गमवावे लागले

Sangli Boat Overturn | सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू
| Edited By: | Updated on: Aug 08, 2019 | 6:01 PM
Share

सांगली : सांगलीमध्ये महापुराने (Sangli Flood) थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. ब्रम्हनाळ (Brahmanal) गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना बोट उलटून (Boat Overturn) 14 जणांचा मृत्यू झाला. ही बोट 30 जणांना घेऊन जात होती, त्यावेळी ही दुर्घटना झाली. बुडालेली बोट ग्रामपंचायतीची असल्याचं सांगण्यात येत आहे.

सांगलीतील चार तालुक्यांना पुराचा वेढा आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यावेळी बोट उलटून घडलेल्या अपघातात 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 16 जण बेपत्ता आहेत.

नेमकं काय झालं?

ब्रम्हनाळ (Brahmanal) गावात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एका बोटीचा वापर करण्यात येत होता. ब्रम्हनाळपासून खटावकडे या पूरग्रस्तांना नेण्यात येतं होतं. बोटीची क्षमता 17 जणांची असताना या बोटीत 30 जण बसले होते. त्यामुळेच सर्व पूरग्रस्तांकडे पुरेसे लाईफजॅकेट्स नसल्याचं म्हटलं जात आहे.

ब्रह्मनाळ आणि वसगडे या गावांचा प्रवास ग्रामपंचायतीच्या नावेने केला जातो. वर्षभर इथली वाहतूक अशाच पद्धतीने होते. पुरामुळे या भागात सध्या वीजेचे खांब, मोठ मोठी झाडं शेंड्यापर्यंत बुडाली आहेत. त्यामुळे नेमकी बोट कुठल्या दिशेने न्यायची हेच लक्षात आलं नसावं. ग्रामपंचायतीच्या बोटीतून नेहमी वाहतूक होत असली तरी पुराच्या पाण्याने मार्ग समजण्यास अडथळा येत होता.

मंदीर, झाड, कठडे पाहून अंदाजाने मार्गक्रमण सुरु होते. त्यावेळी बुडालेल्या झाडाच्या फांदीला बोट लागली आणि ती क्षणात पलटी झाली. कोणाकडेही लाईफ जॅकेट नव्हतं. खासगी बोटीत तशी व्यवस्थाच नव्हती. नियमित सवयीप्रमाणे ही बोट नेली जात होती. 

पाण्याची स्थिती इतकी भीषण आहे की बोट पलटी होताच अनेक जण वाहून गेले. मोठी झाडं पाण्यात गेलेत, वीजेचे खांब पाण्यात गेलेत त्यामुळे जायचं कुठं हेच कळत नव्हतं. बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला आणि बोट पलटली.

मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, दोघा लहान मुलांचा समावेश आहे, तर इतरांविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. इतर बेपत्ता पूरग्रस्तांचा शोध सुरु आहे.

ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील मृतांची नावे

1) कल्पना रवींद्र कारंडे

2) कस्तुरी बाळासो वडेर

3) पप्पू ताई भाऊसो पाटील

4) लक्ष्मी जयपाल वडेर

5) राजमाती जयपाल चौगुले

6) बाबासो अण्णासो पाटील

Sangli Boat Overturn | काईलीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले, घटनास्थळी काय घडलं?

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

सांगली बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात जाहीर केली. प्राथमिक स्वरुपात दहा हजांची मदत देण्यात येणार आहे. बोट दुर्घटनेची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

तहसीलदारांची प्रतिक्रिया

बोटीच्या पंखात कचरा अडकल्यामुळे बोट उलटली, अशी माहिती पलुसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली आहे. संबंधित बोट ग्रामपंचायतीची असून ती नियमितपणे प्रवासासाठी वापरली जात असल्याचंही पोळ यांनी सांगितलं.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

लाईफ जॅकेट घातल्याशिवाय कोणालाही बोटीत बसू देता कामा नये : पृथ्वीराज चव्हाण

कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 56 फूट 8 इंचावर गेली आहे.

सांगली जिल्ह्यातील 70 हजार नागरिक आणि 21 हजार जनावरं स्थलांतरित करण्यात आली आहेत. 21 हजार 500 हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. भारतीय सैन्य आणि एनडीआरएफच्या टीमकडून अजूनही बचावकार्य सुरुच आहे.

एनडीआरएफच्या आणखी दोन टीम आणि कोस्टगार्डच्या दोन टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. गरज भासल्यास जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात येणार आहे.

सांगलीतील महापुरामुळे कैदी कारागृहात अडकले

सांगलीमधील कारागृहात पाणी शिरल्यामुळे तब्बल 390 कैदी अडकले होते. पाणी पातळी वाढू लागल्यानंतर कैद्यांच्या स्थलांतरासाठी तुरुंगाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोटी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

तुरुंगाच्या जवळ असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये आता या कैद्यांची रवानगी करण्याची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे, महापुराच्या पाण्यात अडकल्याचा फायदा घेत दोघा कैद्यांनी कारागृहातून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.