Vaccination: औरंगाबादेत बोगस लस प्रमाणपत्र देणारे सरकारी डॉक्टर व नर्सच्या टोळीचा पर्दाफाश!

एकिकडे कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका औरंगाबादेत युद्ध पातळीवर काम करताना दिसतेय तर दुसरीकडे बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणारी टोळीही सक्रीय झालेली आढळून आली. औरंगबााद पोलिसांनी अशा टोळीचा मंगळवारी पर्दाफाश केला.

Vaccination: औरंगाबादेत बोगस लस प्रमाणपत्र देणारे सरकारी डॉक्टर व नर्सच्या टोळीचा पर्दाफाश!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 9:33 AM

औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी  लसीकरणासाठी (Vaccination) सक्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र याचा परिणाम म्हणून शहरात बनावट कोरोना लस देणारी टोळी सक्रीय झाली. जिन्सी पोलीसांनी (Aurangabad police) 500 ते दोन हजार रुपयांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांना मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्यांनी आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बोगस लस प्रमाणपत्रे दिल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉ. रझीउद्दीन हा या टोळीचा मास्टरमाइंड होता, असेही समोर आले आहे.

टोळीत सरकारी डॉक्टर आणि नर्स

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासकांमार्फत युद्ध पातळीवर मोहीम राबवली जात असतानाच मंगळवारी लसीकरणातील ही बोगसगिरी समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी डॉ. शेख रझीउद्दीन फहीमुद्दीन, डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक यांना अटक करण्यात आली. तर सिस्टर आढाव, शहेनाज शेख सरकारी कागदपत्रांवर लस घेतल्याच्या खोट्या नोंदीवरून बनावट प्रमाणपत्र तयार करत होत्या.

खबऱ्यांकडून माहिती, पोलिसांनी रचला सापळा

अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी उपनिरीक्षक अनंत तांगडे यांना सोबत घेत बनावट ग्राहक तयार केले. त्यांनी टोळीतील काहीजणांशी संपर्क साधला. प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवल्यावर उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या सर्व टोळीला घेराव घालत डॉक्टर भावंडांसह कामगार अबू बकर, मोहम्मद मुदस्सीर यांना रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या चौकशीत, या टोळीने औरंगाबादमध्ये 400 पेक्षा जास्त बनावट प्रमाणपत्र दिली असल्याचे उघडकीस आले.

इतर बातम्या-

St worker strike : कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात-सूत्र

Raj Thackeray | लोक मला फुकट घालवत आहे, राज ठाकरेंनी बोलून दाखवली सल…

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.