AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan | सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोना, सारासह कुटुंबियांची चाचणी निगेटिव्ह

सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मुंबई पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात (Sara Ali Khan Driver Corona Positive) आले आहे.

Sara Ali Khan | सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोना, सारासह कुटुंबियांची चाचणी निगेटिव्ह
| Updated on: Jul 14, 2020 | 12:55 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची बाधा झाली (Sara Ali Khan Driver Corona Positive) आहे. त्याला पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने साराच्या संपूर्ण कुटुंबियांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तिने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली.

सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मुंबई पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर तिची आई अभिनेत्री अमृता सिंग, इब्राहिम अली खान, सारा अली खान आणि इतर लोकांच्या टेस्ट करण्यात आली. सुदैवाने या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती साराने दिली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

साराने इन्स्टाग्राम टाकलेल्या पोस्टनुसार, “आमच्या ड्रायव्हरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आला आहे. यानंतर मी आणि माझ्या कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच घरातील इतर कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या. या सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.”

“मात्र तरीही आम्ही सर्वजण खबरदारी घेत आहोत. मला आणि माझ्या कुटुंबाला सहकार्य केल्याबद्दल मी मुंबई महापालिकेचे आभार व्यक्त करते,” अशी पोस्ट साराने इन्स्टाग्रामवर टाकली आहे.

View this post on Instagram

??????

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

दरम्यान बॉलिवूडमध्ये दबदबा असलेल्या बच्चन कुटुंबात कोरोनाने शिरकाव केला आहे. आधी महानायक अमिताभ बच्चन, त्यानंतर त्यांचे पुत्र-अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्यानंतर सून-अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सुदैवाने बिग बी यांच्या पत्नी आणि खासदार-अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले (Sara Ali Khan Driver Corona Positive) आहेत.

संबंधित बातम्या :

Actress Rekha Covid Test | ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ‘कोरोना’ चाचणी करणार

Bachchan Family Corona: जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वस्ता, बच्चन कुटुंबाच्या बंगल्यातील 56 जण होम क्वारंटाईन

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...