Bachchan Family Corona: जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वस्ता, बच्चन कुटुंबाच्या बंगल्यातील 56 जण होम क्वारंटाईन

बच्चन कुटुंबातील जवळपास 56 जणांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे (Bachchan Corona 56 people home quarantine ).

Bachchan Family Corona: जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वस्ता, बच्चन कुटुंबाच्या बंगल्यातील 56 जण होम क्वारंटाईन
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 10:24 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील जवळपास 56 जणांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे (Bachchan Corona 56 people home quarantine ). बच्चन कुटूंबातील चौघांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. हा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. सध्या जनक आणि जलसा येथे 28 जणांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने रविवारीच (12 जुलै) ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे बच्चन कुटुंबाचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. चारही बंगल्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांमधील सुमारे 30 कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यापैकी बऱ्याच जणांचे कोरोना अहवाल आज दुपारी येणार आहेत. दरम्यान, बीग बी यांनी रात्री ट्विट करुन आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, अमिताभ, अभिषेक यांच्यापाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची कन्या आराध्या बच्चन हिलाही कोरोनाची लागण झाली आहे (Aishwarya Rai Bachchan report corona positive). दुसरीकडे बिग बी यांच्या पत्नी, खासदार जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत (Aishwarya Rai Bachchan report corona positive).

संबंधित बातम्या :

Aishwarya Rai Corona | बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात, ऐश्वर्या-आराध्या यांनाही संसर्ग

Bachchan Family Corona | खासदार जया बच्चन, कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Amitabh Bachchan Corona : “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करतील, गृहमंत्र्यांसह राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानातही दुवा, शोएब अख्तरचीही प्रार्थना

Bachchan Corona 56 people home quarantine

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.