AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलक्ष्मीचा अपमान, ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन… ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घाला; हिंदु जनजागृती समितीची मागणी

अक्षय कुमारच्या सिनेमातून श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली गेली आहे. तसंच या सिनेमातून 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरीत बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

श्रीलक्ष्मीचा अपमान, 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन... 'लक्ष्मी बॉम्ब'वर बंदी घाला; हिंदु जनजागृती समितीची मागणी
| Updated on: Oct 16, 2020 | 7:55 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmi Bomb) हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमातून श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली गेली आहे. तसंच या सिनेमातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरीत बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे तसंच बंदी न घातल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे. (Boycott Of Akshay Kumar laxmi Bomb Demand Hindu janjagruti Samiti)

या सिनेमाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं हेतूतः असं ठेवलं आहे. त्यामुळे आमचा पहिला आक्षेप या चित्रपटाच्या नावाला असून यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे. एकीकडे हिंदु देवतेचा अपमान करणारे ‘लक्ष्मी फटाके’ बंद करण्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे प्रबोधन करत असतांना, या चित्रपटाच्या नावामुळे त्यांना पुन्हा प्रोत्साहनच मिळणार असल्याचं सांगत या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, असं हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी म्हटलं आहे.

या चित्रपटात नायकाचे नाव ‘आसिफ’, तर नायिकेचे नाव ‘प्रिया यादव’ ठेवल्याचे दिसत आहे, अर्थात त्यातून मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांचे संबंध दाखवून हेतूतः ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहनच दिले आहे, असा आरोपही हिंदु जनजागृती समितीने केला आहे.

एकीकडे ‘मोहम्मद : दी मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटामुळे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात, म्हणून त्यावर स्वतः दखल घेऊन लगेच बंदीची शिफारस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याच धर्तीवर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावरही सरकारने बंदीची शिफारस करावी, अशी मागणीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एक भूताने पछाडलेल्याची भूमिका साकारत आहे. त्याच्यातील भूत तृतीय पंथीय असल्याचे भासते. तसेच मोठे लाल कुंकू, लाल साडी, केस मोकळे सोडणे, हातात त्रिशूळ घेऊन नाचणे, हे जणू देवीचेच रुप असल्याचे भासवण्याचा केलेला प्रयत्न हा निषेधार्ह आहे, असं रमेश शिंदे म्हणाले.

दिवाळीच्या निमित्ताने ‘लक्ष्मी बॉम्ब’ नावाने चित्रपट काढणारे कधी ईदच्या निमित्ताने ‘आयेशा बॉम्ब’, ‘शबीना बॉम्ब’, ‘फातिमा बॉम्ब’ नावाने चित्रपट काढण्याची हिंमत करतील का ? मुसलमानांच्या धार्मिक भावनांचा विचार चित्रपट निर्माते आणि शासनकर्ते करतात, तसा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार का करत नाहीत ? हिंदूंशी पक्षपाती वागणे, हीच सर्वधर्मसमभावाची व्याख्या आहे का? हिंदुविरोध हेच जणू सध्याचे सेक्युलॅरिझम झाले आहे, असंही ते म्हणाले.

(Boycott Of Akshay Kumar Laxmi Bomb Demand Hindu janjagruti Samiti)

संबंधित बातम्या :

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा धुमाकूळ, 24 तासात 7 कोटी व्ह्यूज

Laxmmi Bomb Trailer | ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका, अक्षय कुमारचा नवा ‘क्वीन’ अंदाज!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.