AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा बसवा, ब्राह्मण महासंघ आक्रमक

पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावरुन पुन्हा वादंग माजण्याची शक्यता आहे. कारण संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभारण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. 3 जानेवारी 2017 च्या मध्यरात्री संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडण्यात आला होता. ‘राजसंन्यासी’ नाटकातून राम गणेश गडकरी यांना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप आहे. तोडलेल्या स्मारकाची पूजा पुण्यात संभाजी […]

संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा बसवा, ब्राह्मण महासंघ आक्रमक
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावरुन पुन्हा वादंग माजण्याची शक्यता आहे. कारण संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभारण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. 3 जानेवारी 2017 च्या मध्यरात्री संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडण्यात आला होता. ‘राजसंन्यासी’ नाटकातून राम गणेश गडकरी यांना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप आहे.

तोडलेल्या स्मारकाची पूजा

पुण्यात संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या पुतळ्यावरुन ब्राह्मण महासंघ पुन्हा अक्रमक झालं आहे. पुणे महानगरपालिकेच्या आश्वासनची आठवण करुन देण्यासाठी तोडलेल्या स्मारकाची निषेधात्मक पूजा करण्यात आली. पुतळ्याच्या वादग्रस्त जागेत प्रशासनानं मनाई केल्यानं संरक्षक कुंपणाला पुष्पहार अर्पण करुन पूजा केली. गडकरी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं ब्राह्मण महासंघानं पूजा करुन मनपा प्रशासनाचा निषेध केला.

ब्राह्मण महासंघाचे आरोप का?

एका महिन्यात पुतळ्याचा निर्णय न झाल्यास महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या दालनात गडकरींचा पुतळा बसवण्याचा इशारा ब्राह्मण महासंघानं दिला आहे. यावेळी ब्राह्मण महासंघानं मुख्यमंत्री आणि महानगरपालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्यासाठी महासंघ पाठपुरावा करतंय. मुख्यमंत्र्यांनी अश्वासन दिलं होतं. मात्र तीन वर्षांत एक दगड रचला नसल्यानं स्मारक होऊ द्यायचं नसल्याचा आरोप ब्राह्मण महासंघानं केला आहे.

पुतळ्यासाठी मनपा प्रशासनानं कुठंही जागा दिली तर ब्राह्मण महासंघ स्वखर्चाने पुतळा बसवेल, असंही ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी म्हटलंय.

Follow Us
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...