Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”लॉकडाऊन दरम्यान उल्हासनगर येथे लग्नसोहळा, पोलिसांची कारवाई” date=”16/04/2020,2:59PM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊन दरम्यान उल्हासनगर येथे लग्नसोहळा पार पडला आहे. पोलिसांनी या लग्नसोहळ्यावर कारवाई केली आहे. वधू-वर आणि सोहळ्यातीस सहभागींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत एका गर्भवती महिलेसह तिघांना करोनाची बाधा” date=”16/04/2020,2:56PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये एका गर्भवती महिलेसह तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमध्ये करोना बधितांचा आकडा आता 28 वर पोहोचला आहे. डॉ. सुंदर कुलकर्णी आणि डॉ. अरविंद गायकवाड यांनी ही माहिती दिली. [/svt-event]

[svt-event title=”वसई, विरार, नालासोपाऱ्यात नवे 4 कोरोना रुग्ण” date=”16/04/2020,2:54PM” class=”svt-cd-green” ] वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात 4 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. वसई विभागात आतापर्यंत एकूण 56 कोरोना रुग्ण आढळले आहेत. नवीन 4 रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून कोरोना लढ्यासाठी 10 कोटींची मदत ” date=”16/04/2020,2:49PM” class=”svt-cd-green” ] नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून कोरोना लढ्यासाठी 10 कोटींची मदत सरकारला केली आहे. मुख्यमंत्री सहय्यता निधीसाठी धनादेश देऊन मदत केली. [/svt-event]

[svt-event title=”Corona – जगभराची खबरबात | अमेरिकेत दिवसभरात जवळपास 2600 ‘कोरोना’बळी, तर महाराष्ट्रात नवे रुग्ण घटले” date=”16/04/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आजाराचा बनाव, पुणे मनपा कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करणार, अतिरिक्त आयु्क्तांचा इशारा” date=”16/04/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द, ‘हे’ आहे कारण… ” date=”16/04/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण, 72 जण क्वारंटाईन” date=”16/04/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मुस्लिम मंचाने सर्वधर्मीय कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली https://www.” date=”16/04/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या विभागातील बँका बंद राहणार ” date=”16/04/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या विभागातील बँका बंद ठेवण्याचे आदेश बँकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. पण बँकांचे एटीएम पूर्ण क्षमतेने चालू ठेवले जाणार आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक आर्थिकसेवा सरकारी अनुदानाच्या वितरणाची संबंधित बँका चालू ठेवता येईल. सदर बँक ग्राहकांसाठी 10 ते दुपारी 1 पर्यंत सुरू राहील. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर येथे धान्याच्या दुकानात पोलीस कर्मचारी तैनात” date=”16/04/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमधील स्वस्त धान्य दुकानात आता पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रेशन दुकानात अनियमीततेला आळा बसावा म्हणून स्वस्त धान्य दुकानात सरकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. [/svt-event]

[svt-event title=”अकोला जिल्ह्यातील क्वारंटाईन 30 मजूर आणि विद्यार्थी फरार” date=”16/04/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] अकोला जिल्ह्यातील पातूर येथील क्वारंटाईन असलेले 30 मजरू आणि विद्यार्थी 14 एप्रिल रोजी रात्री फरार झाले आहेत. ही घटना काल (15 एप्रिल) उघडकीस आली. क्वारंटाईन असलेले सर्व मजूर, विद्यार्थी राजस्थान, मुंबई, हैद्राबाद आणि नांदेड या भागातील आहेत. या सर्वांना तहसील प्रशासनाने पातूर येथील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी, तहसील कर्मचारी तैनात करण्यात आले होते, असं असतांनाही 14 एप्रिल रोजी 30 मजूर व विद्यार्थी पसार झालेत. [/svt-event]

Published On - 9:46 am, Thu, 16 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI