Breakup Story | 12 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या विनोद खन्नांच्या प्रेमात होती अमृता सिंह, ‘या’ व्यक्तीमुळे झाला ब्रेकअप!

चित्रपटांमध्ये काम करत असताना कधीकधी कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र, प्रेमात पडलेली ही जोडपी कायमची एकमेकांना साथ देतीलच असे नाही. अशा कलाकारांच्या यादीमध्ये अमृता सिंह (Amruta Singh) आणि विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा देखील समावेश आहे.

Breakup Story | 12 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या विनोद खन्नांच्या प्रेमात होती अमृता सिंह, ‘या’ व्यक्तीमुळे झाला ब्रेकअप!
विनोद खन्ना-अमृता सिंह

मुंबई : चित्रपटांमध्ये काम करत असताना कधीकधी कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र, प्रेमात पडलेली ही जोडपी कायमची एकमेकांना साथ देतीलच असे नाही. अशा कलाकारांच्या यादीमध्ये अमृता सिंह (Amruta Singh) आणि विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा देखील समावेश आहे. 80च्या दशकांत अमृता सिंह आणि विनोद खन्ना यांच्या प्रेमाची खूप चर्चा होती. परंतु, काही कारणांमुळे त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहचू शकले नाही (Breakup Story of actress Amruta Singh And Actor Vinod Khanna).

जेव्हा अमृता सिंह स्वतः पेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता विनोद खन्ना यांच्या प्रेमात पडली, तेव्हा सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यावेळी अमृताला विनोदशी लग्न करायचे होते. असे काय झाले की, लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अमृताचा विनोदबरोबर ब्रेकअप झाला?, जाणून घेऊया…

अमृता सिंह- विनोद खन्नाचे अफेअर

असं म्हणतात की, जेव्हा अमृता आणि विनोद रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा त्यांची प्रेमकथा सर्वात जास्त चर्चेत होती. दोघांची पहिली भेट ‘बंटवारा’ या सुपरहिट चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या मल्टीस्टारर चित्रपटाची निर्मिती जे.पी.दत्ता यांनी केली होती. पण, जेव्हा सेटवर अमृता हँडसम हंक विनोदला भेटली, तेव्हा ती त्याची फॅन झाली. एबीपीच्या वृत्तानुसार, अमृताला पहिल्याच भेटीत विनोद आवडू लागला होता. परंतु, अभिनेताने अमृताला अजिबात भाव दिला नाही. पण, नंतर हळू हळू दोघेही चांगले मित्र झाले.

‘या’ व्यक्तीला करत होती डेट

मीडिया रिपोर्टनुसार, अमृता विनोदला भेटली तेव्हा ती माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना डेट करत होती. दोघेही एकमेकांशी लग्न करणार होते. पण, ती विनोदच्या प्रेमात कशी पडली, हे स्वतः अमृताला देखील कळले नाही. असं म्हणतात की, रवी स्वत: अमृताची चेष्टा करत असे आणि विनोद तुला कधीच भेटणार नाही, असं म्हणत. तेव्हा अभिनेत्रीची खूप चिडचिड व्हायची.

अमृताला ऐकावे लागले टोमणे

एक काळ असा आला की, जेव्हा विनोद आणि अमृताच्या प्रेमाच्या बातम्या त्या काळच्या वर्तमानपत्रांत छापून येऊ लागल्या. एवढेच नव्हे, तर लोक विनोदला अमृताचे वडीलही म्हणत असत. पण या सर्व बाबींकडे लक्ष न देता विनोदबरोबर राहण्याची अभिनेत्रीची इच्छा होती.

का झाला ब्रेकअप?

अमृता सिंह आणि विनोद यांचे नाते फार काळ टिकले नाही. असं म्हणतात की, अभिनेत्रीच्या आईला त्यांचे संबंध मान्य नव्हते. जेव्हा, अमृताची आई रुकसाना सुलतान यांना अमृताच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली, तेव्हा तिची मुलगी आपल्यापेक्षा 12 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या माणसाशी लग्न करू इच्छिते ही गोष्ट त्यांना पटली नाही. आईचा नात्याला विरोध पाहून, अमृताने नाईलाजास्तव विनोद खन्नाबरोबर ब्रेकअप केला.

(Breakup Story of actress Amruta Singh And Actor Vinod Khanna)

हेही वाचा :

Love story | नेहमीच हीना खानचा आधार बनला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल, नॅशनल टीव्हीवर केलं प्रपोज!

Indian Idol 12 | सोशल मीडियावर ट्रोल होतेय षण्मुखप्रिया, जावेद अख्तर यांनी सांगितलं कारण!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI