Indian Idol 12 | सोशल मीडियावर ट्रोल होतेय षण्मुखप्रिया, जावेद अख्तर यांनी सांगितलं कारण!

दिग्गज गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) या आठवड्यात सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’च्या (Indian Idol 12) मंचावर विशेष अतिथी म्हणून येणार आहेत. सर्वांसमोर नेहमी आपला मुद्दा बेधडकपणे मांडणारे जावेद अख्तर ट्रोल होणारी इंडियन आयडॉलची स्पर्धक षण्मुखप्रिया (Shanmukhpriya) हिला प्रोत्साहन देताना दिसणार आहेत.

Indian Idol 12 | सोशल मीडियावर ट्रोल होतेय षण्मुखप्रिया, जावेद अख्तर यांनी सांगितलं कारण!
इंडियन आयडॉल 12

मुंबई : दिग्गज गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) या आठवड्यात सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’च्या (Indian Idol 12) मंचावर विशेष अतिथी म्हणून येणार आहेत. सर्वांसमोर नेहमी आपला मुद्दा बेधडकपणे मांडणारे जावेद अख्तर ट्रोल होणारी इंडियन आयडॉलची स्पर्धक षण्मुखप्रिया (Shanmukhpriya) हिला प्रोत्साहन देताना दिसणार आहेत. आगामी एपिसोडमध्ये आयडॉलचे टॉप 7 स्पर्धक जावेद अख्तर यांची प्रसिद्ध गाणी रंगमंचावर सादर करणार आहेत. या दरम्यान शोची ‘योडलिंग क्वीन’ षण्मुखप्रिया जावेद अख्तर यांच्या सांगण्यावरून स्टेजवर ‘मैं हूं झूम झूम झूम झुमरू’ हे गाणे सादर करणार आहे (Indian Idol 12 Javed Akhtar praised Shanmukhpriya on stage).

केवळ जावेद अख्तरच नाही तर मंचावर उपस्थित असलेले प्रत्येकजण षण्मुखप्रियाची ही धमाकेदार कामगिरी आणि योडलिंग पाहून स्तब्ध होतील. षण्मुखप्रियाच्या सादरीकरणानंतर जावेद अख्तर यांनी तिला सांगितले की, ‘मी तुझी बरीच गाणी यू ट्यूबवर पाहिली आहेत आणि आज मी तुला लाईव्ह गाताना पाहिले आहे. सोशल मीडियावर तुझ्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत, हे मला माहित आहे. मला वाटत की आणखी बोललं पाहिजे… लोक तुझ्याविरूद्ध बोलतील. ते तुझ्यावर बंदी घालण्याची मागणी करतील.’

षण्मुखप्रिया सर्वश्रेष्ठ!

जावेद अख्तरच्या या शब्दांनी शोच्या परीक्षकांना, तसेच षण्मुखप्रिया आणि इंडियन आयडॉलच्या सर्व स्पर्धकांना धक्का बसला. पण पुढे ते म्हणाले की, ‘कोणतीही हुशार मुलगी तुझ्यासारखी. अशी प्रतिस्पर्धी असेल, जशी तू आहेस, इतका आत्मविश्वास असेल, जितका तुला आहे, ती पुरुषांना आवडत नाही. त्यांना कोणती मुलगी आवडते, जी थोडीशी संकोच करते, जी लाजाळू आहे. जिला वाटतं की मी हे करू शकेन की नाही…मात्र, तुझं तसं नाही, तुला आत्मविश्वास आहे की तूच हे करू शकशील.’

जावेद अख्तर म्हणाले…

जावेद अख्तर यांनी, षण्मुखप्रिया हिला आपली मैत्रीण म्हणतांना सांगितले की, तुम्ही काळजी करू नका आणि अशा लोकांना आपल्या कामातून उत्तरे देत राहा. तुझे भविष्य खूप उज्ज्वल आहे. जावेद अख्तर यांच्या या कौतुकाशी चाहते अजूनही सहमत नाहीत. यानंतर ते षण्मुखप्रियासह जावेद अख्तर यांना देखील ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

(Indian Idol 12 Javed Akhtar praised Shanmukhpriya on stage)

हेही वाचा :

Photo : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील सासू-सूनेची आहे घट्ट मैत्री, अक्षया नाईकनं व्यक्त केल्या भावना

राज कुमार रावसोबत काम करू इच्छिते समांथा अक्किनेनी, पाहा काय म्हणाली अभिनेत्री…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI