Indian Idol 12 | जितकं गॉसिप होईल, तितकाच टीआरपी वाढेल! कुमार सानूने उडवली ‘इंडियन आयडॉल 12’ची खिल्ली

सोनी टीव्हीचा लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) सध्या बराच चर्चेत आला आहे. या शोबद्दल बरेच वाद समोर आहेत. परंतु, असे असूनही या शोला बरीच पसंती दिली जात आहे. ‘इंडियन आयडॉल’ 12 वर्षांपासून टीव्हीवर येत आहे आणि हा कार्यक्रम लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक आहे.

Indian Idol 12 | जितकं गॉसिप होईल, तितकाच टीआरपी वाढेल! कुमार सानूने उडवली ‘इंडियन आयडॉल 12’ची खिल्ली
कुमार सानू

मुंबई : सोनी टीव्हीचा लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) सध्या बराच चर्चेत आला आहे. या शोबद्दल बरेच वाद समोर आहेत. परंतु, असे असूनही या शोला बरीच पसंती दिली जात आहे. ‘इंडियन आयडॉल’ 12 वर्षांपासून टीव्हीवर येत आहे आणि हा कार्यक्रम लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक आहे. हा शो गेल्या काही दिवसांपासून वादात अडकला आहे (Kumar Sanu talks about show Indian Idol 12 and controversy).

प्रसिद्ध गायक कुमार सानू पाहुणे परीक्षक म्हणून या शोमध्ये बर्‍याच वेळा उपस्थित राहिले आहेत. या शोबद्दल त्यांनी अनेक वेळा आपली मतं मांडली आहेत. पण, नुकतेच त्यांनी असे वक्तव्य केले की, त्यावरून ते या शोची खिल्ली उडवत असल्याचे दिसून आले आहे.

काय म्हणाले कुमार सानू?

वास्तविक, कुमार सानू यांना विचारण्यात आले होते की, इंडियन आयडॉल हा शो या दिवसात बराच चर्चेत आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की हा शो कार्यक्रमाला पुढे जाण्यास मदत करत आहे? तर, हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना ते म्हणाले, ‘जितकी जास्त गॉसिप होईल, तितका शोचा टीआरपी जास्त वाढेल, ही काही मोठी गोष्ट नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘टॅलेंट नेहमीच जगासमोर येते आणि हे असे कार्यक्रम स्पर्धकांची छुपी प्रतिभा समोर आणतात, पण पुढे काय? केवळ इंडियन आयडॉलच नाही, प्रत्येक शो सार्वजनिक व्यासपीठावर अशा प्रतिभा सादर करतो. कदाचित त्यांना मनोरंजन विश्वात पुढे संधी मिळाली नसली, तरी त्यांना काम करण्याची आणि पैसे मिळवण्याची संधी नक्कीच मिळत असेल.’

अभिजीत भट्टाचार्यची कमेंट

यापूर्वी गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी शोच्या परीक्षकांबद्दल अप्रत्यक्ष भाष्य केले होते आणि त्यांना अनुभवहीन म्हटले होते. नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या शोचे परीक्षण करत आहेत. विशाल गेल्या काही दिवसांपासून शोमधून गायब होता, त्यानंतर अनु मलिक त्याच्या जागी परीक्षक म्हणून दिसला होता. अभिजीतने असेही म्हटले होते की, तो सेलिब्रिटी पाहुणा म्हणून शोमध्ये येत नाही, कारण त्याला संगीताबद्दल जास्त ज्ञान नसलेल्या लोकांना स्टेज शेअर करायचा नाही.

अभिजीत पुढे म्हणाले होते, ‘मी त्यांना आधीच सांगितले होते की, मी काम मागत नाहीय. मी फक्त जे माझ्या हक्काचे आहे, ते विचारत आहे. लोक माझ्या हाताखाली काम करतात. मी काम देणारा आहे. ते अशा लोकांना बोलवतात, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात केवळ 4 गाणी गायली आहेत. त्यांना परीक्षक म्हणतात. त्यांनी कदाचित हिट गाणी दिली असतील पण संगीता क्षेत्राला काहीही दिलेले नाही.

(Kumar Sanu talks about show Indian Idol 12 and controversy)

हेही वाचा :

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आगामी ‘सत्यनारायण की कथा’मध्ये झळकणार

International Widow Day | ‘या’ बॉलिवूड चित्रपटांनी मोठ्या पडद्यावर दाखवली विधवांची व्यथा, अभिनेत्रींनीही केला सशक्त अभिनय!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI